लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरातील रस्ते, नाल्या व मार्केटचे बांधकाम करण्याचा सव्वा पाच कोटी रुपयाचा कंत्राट मुंबईच्या जे.पी. एंटरप्रायजेसला मिळाला. त्यांनी हे काम करण्यासाठी वर्धेचा ठेकेदार सोनू मेश्राम यांना नियुक्त केले. मात्र या सोनूने सर्व कामाची वाट लावली.मार्केटचे काम तर निकृष्ट केलेच मात्र दुकानदारांनी गाळ्यात दुकाने सुरू केल्यावर लोखंडी शटर लावणे व उघडणे दिव्य संकट झाले आहे. अशी संतप्त भावना तेथील दुकानदारांनी व्यक्त केली.शहरातील रस्ते, नाल्या याचे बांधकाम निकृष्ठ झाल्याने त्याची चौकशी व्हावी यासाठी लोकमतने सतत पाठपुरावा केला. गुणनियंत्रण विभागाची चमू पाहणी करुन गेली. रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली हे सर्व रस्ते व नाली बांधकाम खोदून फेकण्याची गरज होती, एवढे निकृष्ठ झाले.रस्त्याला दोन-चार महिन्यात सर्वत्र भेगा पडल्या. तक्रारीनंतर सर्व भेगा पडलेल्या रस्त्यावर सिमेंटचे सारवण केले. सदर ठेकेदारावर कारवाई करणे सार्वजनिक बांधकामात विभागाच्या हातात असतांना ते अर्धे आम्ही-अर्धे तुम्हीत रंगून गेले.शहरवासी यांच्या हक्काच्या पैशाचा गैरवापर झाला. आता पुन्हा नव्याने होणाऱ्या विकास कामांचे कंत्राटही याच ठेकेदाराला मिळाले असल्याने सेलू वासियांना कपाळावर मारुन घेण्याशिवाय पर्याय नाही.मार्केट सुरक्षा भिंतीचे आत मुरुम टाकला त्याची दबाई केली नाही त्यामुळे तेथे पाणी साचते या ठिकाणी तात्काळ सिमेंटीकरण करण्याची मागणी येथील दुकानदारांनी केली आहे. सेलू शहरात कोट्यावधी रूपयांचा निधी शासनाने दिला. स्थानिक नगर पंचायतच्या माध्यमातूनविकास कामे करण्याऐवजी सदर काम शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यास सांगितले होते. बांधकाम विभागाने हे काम दर्जेदार करावे कामाच्या गुणवत्तेत कुठलीही तक्रार ठेवू नये असे निर्देश तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. मात्र सेलू नगर पंचायत क्षेत्रात पालकमंत्र्याच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.सेलू शहरातील ठेकेदाराकडून केल्या गेले सर्व कामे कसे निकृष्ठ आहे याचा लोकमतने पाठपुरावा केला यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग हलला. गुणनियंत्रण विभागाने दखल घेतली व सर्व रस्त्याची कामे समाधानकारक नसल्याने ठेकेदारास फटकारले त्यानंतर सर्व रस्त्यावरील भेगावर सिमेंटचे सारवण केले. हे निकृष्ठ काम खोदून फेकून देण्याच्या लायकीचे असताना सर्व सत्तारूढ व विरोधी सदस्य डोळे बंद करुन का बसले हा खरा प्रश्न आहे.
सेलूतील रस्ते, नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:07 AM
मार्केटचे काम तर निकृष्ट केलेच मात्र दुकानदारांनी गाळ्यात दुकाने सुरू केल्यावर लोखंडी शटर लावणे व उघडणे दिव्य संकट झाले आहे. अशी संतप्त भावना तेथील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरातील रस्ते, नाल्या याचे बांधकाम निकृष्ठ झाल्याने त्याची चौकशी व्हावी यासाठी लोकमतने सतत पाठपुरावा केला. गुणनियंत्रण विभागाची चमू पाहणी करुन गेली. रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली हे सर्व रस्ते व नाली बांधकाम खोदून फेकण्याची गरज होती, एवढे निकृष्ठ झाले.
ठळक मुद्देसिमेंट रस्त्याला भेगा : कंत्राटदाराने केली डागडुजी