शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

सोन्याच्या नावावर लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 9:55 PM

सोन्याच्या आकर्षक वस्तू देण्याची बतावणी करुन; वस्तू खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघांना अटक केली आहे. संजय उर्फ बाळू महादेव जाधव (३६), अनिल साधुसिंग राठोड (३२) दोघेही रा. रामगाव, जि.यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोन्याच्या आकर्षक वस्तू देण्याची बतावणी करुन; वस्तू खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघांना अटक केली आहे.संजय उर्फ बाळू महादेव जाधव (३६), अनिल साधुसिंग राठोड (३२) दोघेही रा. रामगाव, जि.यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ आॅगस्टला विलास शिवाजी डांगे (४१) रा. संधिनाथ वाडी, वाई-सातारा यांना सोन्याचे अ‍ॅन्टीक पीस दाखवितो म्हणून आरोपी संजय जाधव व त्याच्या सहकाºयांनी देवळी तालुक्याच्या काजळसरा चौरस्ता येथे बोलाविले. त्यानुसार विलास डांगे तेथे आले असता सर्व आरोपींनी त्यांच्या जवळील ५० हजार रुपये रोख व एक मोबाईल असा एकूण ६५ हजाराचा ऐवज हिसकावून पोबारा केला, अशी तक्रार डांगे यांनी देवळी पोलिसांत दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान कारंजा (लाड) येथेही अशीच फसवणूक करण्याची रणनिती आखल्याची माहिती पोलीसांच्या पथकाला मिळाली. पोलीसांनी कारंजा गाठून एम.एच.३७ ए ३९३७ कारसह बाळू जाधव व अनिल राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हाची कबुली दिली असून त्यांच्याकडून मोबाईल व १४,६०० रुपये रोख आणि ४ लाखाची कार, असा एकूण ४ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस