वर्धा : वर्धेच्या हिंगणघाट येथे रविवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण करण्यात आली होती. बसमध्ये सुरु असलेल्या वादात मध्यस्ती केल्याने जेठानंद राजपुत यांना मारहाण करण्यात आली होती. प्रकरणीं पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरु आहे.
घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनानी हिंगणघाट बंदची हाक दिली होती. आज 26 रोजी हिंगणघाट शहरात बंदला समिश्र प्रतिसाद असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले होते. संदेश व्हायरल झाल्याचे कळताच पोलीस अधीक्षकांनी सायबर टीमला हिंगणघाट येथे बोलवत तपासाला सुरवात केली आहे.
Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले आहे. हिंगणघाटात सध्या तणावावाचे वातावरण निवळले असून पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.