राहुल गांधी पाळणार सेवाग्राम आश्रमाचे नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:40 PM2018-10-01T22:40:04+5:302018-10-01T22:40:50+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला येत असलेले ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हेदेखील आश्रमाचे नियम पाळणार आहेत. हे तिन्ही नेते पंक्तीत चटईवर बसून जेवणार आहेत. तसेच स्वत:चे ताटदेखील धुणार आहेत. प्रत्यक्ष कृतीतूनच हे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनादेखील हाच संदेश देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नेहमीच ‘साधे जीवन, उच्च विचार’ यांची शिकवण दिली. त्यांच्या कार्याने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमात ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात येते व आश्रमात येणाऱ्यांना तेथील नियम पाळणे अनिवार्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला येत असलेले ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग हेदेखील आश्रमाचे नियम पाळणार आहेत. हे तिन्ही नेते पंक्तीत चटईवर बसून जेवणार आहेत. तसेच स्वत:चे ताटदेखील धुणार आहेत. प्रत्यक्ष कृतीतूनच हे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनादेखील हाच संदेश देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यास आश्रमाच्या पदाधिकाºयांनी नियमांचा हवाला देत नकार दिला. मात्र सर्व नेत्यांच्या भोजनाची परवानगी मात्र दिली आहे. आश्रमातील परंपरेनुसार येथे साधे जेवण तयार करण्यात येणार आहे. येथेच सर्व नेत्यांचे व पदाधिकाºयांचे जेवण होईल अशी राहुल गांधी यांची सूचना होती. आश्रमाच्या नियमावलीनुसार येथे जेवणाºयांची व्यवस्था शांतीभवनच्या मागे असलेल्या ‘रसोडा’ येथे करण्यात येते. प्रत्येकाला पंक्तीत चटईवर बसून जेवणे, ताटातील पूर्ण अन्न संपविणे, स्वत:चे ताट धुणे या गोष्टी अनिवार्य असतात. गांधी आश्रमात येत असताना आम्ही महात्मा गांधी यांचे अनुयायीच आहोत. त्यामुळे येथील नियमांचे पालन आम्ही स्वत:पासून सुरू करू, असे राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार ते स्वत:पासूनच ही सुरुवात करणार आहेत. अगदी रांगेत उभे राहून जेवण घेण्यापासून ते ताट, वाटी, पेला धुवून जागच्या जागी करण्याचे काम ते स्वत: करणार आहेत.
नियमांचे पालन करा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. गांधी आश्रमातील प्रत्येक नियमाचे पालन झालेच पाहिजे. समाजातील आपले ‘स्टेटस’ बाजूला ठेवून केवळ गांधी विचारांवर चालणारे कार्यकर्ते या भावनेतूनच प्रत्येकाने येथे आले पाहिजे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे.