लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु, यादरम्यान तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावाधाव करावी लागणार आहे. राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदार संघांसाठी सोमवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१, २३ व २४ मार्चची सुटी आल्याने उमेदवारांना आता २०, २२ व २५ मार्च असे चारच दिवस मिळणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून, उमेदवारांच्या अर्जाची छाननी २६ मार्च रोजी करण्यात येईल. २८ मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.आयोगाच्या नियमावलीचे काटेकोरपणे करावे लागेल पालनअर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्र नमुना २ अ, नमुना २६ (नामनिेर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृएकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे.या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवारांची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोष सिद्ध ठरविले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षांत आयकर विवरणपत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅन कार्ड क्रमांक, आयकर विवरण पत्र, भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील आदी माहिती सादर करावयाची आहे.राज्य व देशातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरली जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष) उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणून आवश्यक राहतील. ज्या लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज करणार आहेत त्याच मतदार संघातील प्रस्तावक असणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.
नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:06 AM
वर्धा लोकसभा मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
ठळक मुद्देधुलिवंदन व शनिवार-रविवारची सुटी : २०, २२ व २५ असे चारच दिवस शिल्लक