लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक आगारातून सुटलेली बसगाडी नंदोरी नजिकच्या शेगाव (गोठाडे) येथे पोहोचली असता तिची डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे बस जवळपास ५० फूट घासत गेली. वाहनाची गती कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.या घटनेत कुठलीही प्राणहाणी झाली नसली तरी परिवहन विभागाच्या अनागोंदी कारभाराचा परिचय आला. यावेळी पाऊस असल्याने नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला. प्रवासादरम्यान गाड्या बंद पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यात आता धावत्या बसचे चाक निखळल्याने यात नवा अध्याय जुळला.रिमझिम पावसात हिंगणघाट आगाराची एमएच २० डी ७८३१ चिमूर बस सकाळी ८.३० वाजता हिंगणघाट बसस्थानकावरुन सुटली. या बसच्यापूर्वी सुटणारी ब्रम्हपुरी बस निघाली नसल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होती. ही बस सावली वाघ, मार्गे नंदोरी वरुन चिमूर कडे जात असतांना शेगांव (गोटाडे) परिसरात या धावत्या बसच्या डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे बस जवळपास ५० फुट फरफटत गेली. यावेळी बस मधे जवळपास ५० प्रवाशी असल्याचा अंदाज आहे. बसच्या चाकाचे नट निघाल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.बसस्थानकात बस येण्यापूर्वी आगारात तिच्या फिटनेसची तपासणी केली जाते. त्याप्रमाणे स्थानकावर बस सोडण्यात येतात. सदर बस चिमूर प्रवासासाठी निघाली. परंतु या बसच्या मागच्या चाकाची सर्वच्या सर्व आठ नट निघुन खाली पडली. त्यामुळे दोन्ही चाके बाहेर निघाली. अपघातस्थळ निर्जन असल्याने निघालेल्या या धावत्या चाकांनी कोणाचे नुकसान केले नाही.बसच्या चाकाची सर्व नट निघाले त्यामुळे आगरातील पूर्व तपासणी बाबत संशय निर्माण झाला आहे. या चाकाची नटे सैल असणे हा कोणाचा खोडसाळपणा किंवा घातपाताचा प्रकार तर नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी बसमधील प्रवाशांनी केली आहे.बसची पूर्व तपासणी आगारात होते. यासंबधी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. चालक वाहक आवश्यक प्रमाणात नसल्याने काही बस विलंबाने धावत आहेत.- संजय घुसे, आगार प्रमुख, हिंगणघाट.
धावत्या एसटीची चाके निखळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:16 AM
स्थानिक आगारातून सुटलेली बसगाडी नंदोरी नजिकच्या शेगाव (गोठाडे) येथे पोहोचली असता तिची डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळली. यामुळे बस जवळपास ५० फूट घासत गेली.
ठळक मुद्देशेगांव ( गो.) परिसरात अपघात : थोडक्यात मोठी दुर्घटना टळली