लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम मुख्य मार्गावरील अण्णासागर तलावाचे खोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत आहे. यामुळे सौंदर्यात भर पडणार असून पाणी प्रश्नाचे निरसन होणार आहे.अण्णासागर तलाव सर्व सेवा संघाच्या मालकीचा आहे. मुख्य मार्गावर असून तलावात पावसाळ्यात वाहून येणारे पाणी साचते. परिणामी, परिसरातील विहिरींना मुबलक पाणी असते. तलाव व वनविभागाच्या झाडांमुळे परिसराला सौंदर्य प्राप्त होत असले तरी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमात तलावाचे खोलीकरण सुरू असून सर्वप्रथम लिकेज होऊ नये म्हणून काही माती भरणे, मुरूमाचा भर देवून पिचींग करणे, दोन बाजूंनी तलावात पाणी आणण्यासाठी मोठ्या नाल्या तयार करण्याचे काम झाले आहे. तलावाच्या संरक्षणाच्या दृष्टीने दगडाची पिचिंग आणि तलावात खोदकाम करून मुरूम बांधावर टाकणे, जागा समतल करून वाहत्या पाण्याला वाट करून तलावात आणणे आदी कामे सुरू आहेत. तलावात जलसंचय व्हावा म्हणून आदर्शनगर, वर्धा मार्ग व वरूड रेल्वे मार्ग या दिशेने वा बाजूने येणाºया तथा दवाखाना परिसरातील पावसाच्या पाण्याला मार्ग दिला जाणार आहे. तीन बाजूंनी पाणी तलावात घेण्यासाठी मोठ्या बांधा खोदल्या आहे. यासाठी ६३ लाखांचे नियोजन केले आहे. या कामांमुळे हा तलाव पाणीटंचाईवर मात करण्यास उपयोगी ठरू शकणार आहे.
सेवाग्रामच्या अण्णासागर तलावाचे पालटणार रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:16 AM
वर्धा ते सेवाग्राम मुख्य मार्गावरील अण्णासागर तलावाचे खोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत आहे.
ठळक मुद्देखोलीकरण व संरक्षण भिंतीचे काम सुरू : ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमातून ६३ लाखांचा निधी मंजूर