देवळी : येथील साबाजी जिनिंग फॅक्टरीतील जिनिंग हाऊसमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागली. डिआर रेच्यामध्ये कापसाचे जिनिंग सुरू असताना ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आग विझविण्याकरिता स्थानिक व्यवस्थेसह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आग आटोक्यात आणण्याकरिता सुमारे अर्धा तासाचा कालावधी लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत ५० क्विंटल कापूस व रूई भस्मसात होवून ४ लाखांपर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज जिनिंगचे मालक मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केला. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शहरात आग लागली असताना इतर भागातील अग्निशमन यंत्रणा दाखल झाली; मात्र कर्मचाऱ्यांअभावी स्थानिक पालिकेची अग्निशामक यंत्रणा कुचकामी ठरली. याबाबत शहरात रोष व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
साबाजी जिनिंगला आग
By admin | Published: April 08, 2017 12:28 AM