लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : गत पाच वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत सेलू येथील उपबाजारपेठेतील यार्ड ला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु, येथील यार्डला नाव कधी दिले जाणार याची प्रतीक्षा कायम होती. अखेर बाजार समितीला मुहुर्त सापडला असून सदर प्रतीक्षा २६ सप्टेंबरला संपणार आहे.सन २०१३-१४ च्या सिंदी येथे झालेल्या बाजार समितीच्या आमसभेत विजय माहुरे, रेणुका कोंटबकर, संजय डोळस, उल्हास रणनवरे आदींनी सेलू येथील बाजार समितीमध्ये असणाºया यार्डला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. उपस्थितांनी केजाजी महाराजांच्या नावाजा जयघोष करीत एकमताने ठराव मंजूर केला. परंतु, यानंतर तत्कालीन सभापती रामदास धंदरे व उपसभापती डॉ. राजेश जयस्वाल यांनी सेलू येथे नवीन प्रशस्त यार्ड बांधण्याचे प्रस्तावित आहे, त्या यार्डचे काम पूर्ण झाल्यानंतर संताचे नाव देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. या बाजार समितीचे सुत्र सभापती म्हणून विद्याधर वानखेडे यांचेकडे आले. लोकमतने एक वर्षापूर्वी ‘बाजार समितीला पडला संताच्या नावाचा विसर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर सभापती विद्याधर वानखेडे यांनी पदावरील व्यक्ती जरी बदलला तरी झालेल्या ठरावाची अंमलबजावणी होईल. या नावाला सर्वच संचालकाचा होकार आहे. पण नाव केव्हा देण्यात येईल हे सांगत नाही असे जाहीर केले.गत काही महिन्यापूर्वी सिंदी (रेल्वे) येथील यार्डला संत सखुआई नाव देण्यात आले. त्यामुळे केजाजी भक्तांची आशा पल्लवीत झाली. लवकरच सेलू येथील यार्डला केजाजीचे नाव दिले जाईल अशी अपेक्षा असताना बाजार समितीला मुहुर्तच मिळत नव्हता. पण, उशिरा का होईना २६ सप्टेंबरला धान्य शेडचा श्रीगणेशा करताना सदर नामकरणही केले जाणार आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केजाजी महाराज यांचे नाव असलेल्या धान्य शेडचा श्रीगणेशा खासदार रामदास तडस यांचे हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, शेखर शेंडे, बबन हिंगणेकर, डॉ. राजेश जयस्वाल उपस्थित राहणार आहे.
सेलू येथील यार्डला मिळाले संत केजाजी महाराजांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:07 AM
गत पाच वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत सेलू येथील उपबाजारपेठेतील यार्ड ला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला.
ठळक मुद्देसोमवारी श्रीगणेशा : बाजार समितीला सापडला मुहूर्त