ऐन हंगामावर मजुरांची भटकंती सुरूतळेगाव (श्या.पंत.) : नैसर्गिक आपत्तीसोबत आता महागाईचे संकटही गडद झाले आहे. जीवनावश्यक वस्तुंसह सालदारांचेही दर वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी गुढी पाडव्यापासून शेतकऱ्यांचे नववर्ष सुरू होते. अक्षय तृतीयेपासून शेतकरी नवा सालदार ठेवतो. यावेळी त्याच्या मजुरीत वाढ होत असते. यंदा सर्वत्र मजुरीत २५० ते ३०० रूपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सालदाराची वार्षिक मजुरी १ लाखावर पोहोचली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि महागाईमुळे शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त शेती आहे असे शेतकरी स्वत: शेतात सालदार ठेवत असतात. काहींकडे तर एकापेक्षा अधिक मजूर सालदरी पद्धतीने ठेवले जातात. सालदार वर्षभर शेतातील कामे करीत असतो. त्याचे वर्ष ठरविले जाते. सोबतच विशिष्ट धान्य आणि दिवाळीला कपडाही दिला जातो. आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जात असल्यामुळे शेतमशागतीची अनेक कामे त्वरीत होतात. तरी देखील सालदाराची गरज पदतेच. परंतु ते मिळत नसल्याने त्यांची वार्षिक मजुरी १ लाखावर गेली आहे. मजुरवर्ग रोजगारासाठी अन्य पर्याय शोधत असल्याने समस्या वाढल्या आहेत. मजूर मिळणे दिरापास्त झाले असून त्यांच्या मजुरीतही भरमसाठ वाढ झाली आहे. सोबतच महिला मजुरांचीही मजुरी वाढली आहे.(वार्ताहर)
सालदाराची वार्षिक मजुरी पोहोचली लाखावर
By admin | Published: June 08, 2015 2:33 AM