पाच अटकेत : आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत सेलू : दोन भावांच्या नावावर असलेली संयुक्त शेतजमीन एका भावाने बनावट आधारकार्ड तयार करीत दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून परस्पर विकली. या प्रकरणात तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांना अटक केली. चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर एकाला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपींची संख्या वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेत. राजकुमार ईश्वर देवरे (२१) रा. सेलू, असे बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्याचे नाव आहे. त्याला पोसिांनी सोमवारी अटक केली. यापूर्वीही असे अनेक प्रकार उघड झाले असून शासकीय यंत्रणेतील काहींचा सहभाग असल्याचा संशय आहे. महाबळा ग्रा.पं. अंतर्गत मौजा इटाळा येथील शेत सर्व्हे क्र. १७३ आराजी १.५२ हे.आर. ही शेतजमीन भूजंग व सुदाम यादवराव पाहुणे या दोन भावांच्या नावावर आहे.
बनावट आधार कार्डवर शेतजमिनीची विक्री
By admin | Published: April 20, 2017 12:50 AM