:रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे समोर आले. यामुळे न्यायालयाने अशा मूर्तींवर बंदी घातली. न्यायालयाच्या या निर्णयाला प्रतिसाद देत वर्धेतील दोन मूर्ती विक्रेत्यांनी त्यांच्याकडून मूर्ती घेणाºया ग्राहकांना ही मूर्ती मातीचीच आहे, नसल्यास रक्कम परत देऊ असे हमीपत्र देत मूर्तींची विक्री केली.वर्धेत वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने दोन वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सवाकरिता जनजागृती सुरू केली. याच जनजागृती वर्धेतील गजानन भांगे आणि नीरज शिंगोटे हे दोन उच्चशिक्षित मूर्तीकार सहभागी झाले. त्यांनी पर्यावरण रक्षणाकरिता मातीची गणेशमूर्ती विक्रीस ठेवत ती मातीचीच असल्याचे हमीपत्र देण्याचा अनोखा प्रकार अंमलात आणल्याचे दिसले. त्यांच्याकडून मूर्ती विकत घेणाºया नागरिकांना ते हमीपत्रात मूर्ती पर्यावरणास बाधक असली तर पैसे परत मिळतील असे ते लिहून देत आहे. सर्वत्र प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती विकल्या जात असल्याने पर्यावरणाचा ºहास होत आहे. यावर मार्ग काढण्याकरिता कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्या उपरही असे होत आहे. यावर मार्ग म्हणून जनजागृती आणि पुढाकाराशिवाय पर्याय नसल्याने वर्धेतील मूर्तीकारांनी अंगीकारलेला हा प्रकार सर्वांना विचारात पाडणारा असाच आहे.
वर्धेत हमीपत्रावर गणेश मूर्तींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 2:19 PM
:रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे समोर आले. यामुळे न्यायालयाने अशा मूर्तींवर बंदी घातली. न्यायालयाच्या या निर्णयाला प्रतिसाद देत वर्धेतील दोन मूर्ती विक्रेत्यांनी त्यांच्याकडून मूर्ती घेणाºया ग्राहकांना ही मूर्ती मातीचीच आहे, नसल्यास रक्कम परत देऊ असे हमीपत्र देत मूर्तींची विक्री केली.वर्धेत वैद्यकीय ...
ठळक मुद्दे पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयाला प्रतिसादनागरिकांकडूनही खरेदीकरिता गर्दी