लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: संचार बंदी असताना घोराड या गावामध्ये खर्रा व दारूची काहीजण खुलेआम नव्हे तर लपून दारू विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चोरून विक्री होत असलेल्या खर्रा व दारुच्या किंमतीही वाढल्या आहेत.स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती ने दारू विक्री करणाऱ्यांच्या घराला भेट देत दारू विक्री करू नये यामुळे आपल्या घरासमोर गर्दी होणार नाही असा समज दिली. यात काहींनी गावठी मोहा दारू विक्री बंद केली. पण काही दारू विक्रेत्यांनी याला हरताळ फासत मोहा दारूची नीप ५० रू तर विदेशी दारू २५० रू ला विकणे सुरू केले आहे. यात घर पोच दारूविक्रीही सुरू झाली असून तीत एक नीप २७५ रू ला विकली जात आहे. संचार बंदी व जिल्हा बंदी असताना ही दारू बनावट तर नाही ना असे बोलल्या जात आहे. गावातील मुख्य चौकात दारू विक्री होत असल्याने नवल व्यक्त केले जात आहे तर १० रू ला मिळणार खर्रा आता १५/२० रू ला विकला जात आहे. पान टपरी बंद करून त्याच परिसरात खिशातून काढून खर्रा विक्री जोमात सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्व उपाय योजना होत असताना मात्र याचा फायदा घेत सक्रिय झालेल्या दारू विक्रेत्यांवर वचक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पानटपऱ्या बंद झाल्या तरी खिशात ठेवून होतेय खर्ऱ्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:22 AM
संचार बंदी असताना घोराड या गावामध्ये खर्रा व दारूची काहीजण खुलेआम नव्हे तर लपून दारू विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चोरून विक्री होत असलेल्या खर्रा व दारुच्या किंमतीही वाढल्या आहेत.
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे खर्रा व दारूचे भाव कडाडलेबंद दुकानातून सुरू आहे विक्री