लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेला आॅनलाईन लिलाव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी बंद पाडला. त्यानंतर झालेल्या ओपन लिलावात ३०० ते ५०० रूपये प्रती क्विंटलने सोयाबीनचा अधीक भाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. यानंतर आॅनलाईन लिलाव करायचा नाही, अशी तंबी निवेदनातून आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीला दिली.वर्धा बाजार समितीत आॅनलाईन लिलावाची पद्धत असून शेतकºयांचा माल बाजार समितीत आल्यानंतर त्या मालाची नोंदणी बाजार समितीच्यावतीने करण्यात येते. नोंदणी झाल्यावर शेतकºयांच्या मालाचा भाव बाजार समितीच्यावतीने ठरविण्यात येते. व्यापारी ५० ते १०० रूपये ठरविलेल्या भावावर वाढवून चांगल्या प्रतीचे सोयाबीन अल्प दरात खरेदी करते. ही प्रक्रिया काही शेतकºयांच्या निदर्शनास आली. शेतकºयांनी रोष व्यक्त करीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे यांना याची माहिती दिली. त्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांसह बाजार समिती गाठली. त्यांनी लिलावासाठी ठेवून असलेल्या सोयाबीनची पाहणी केली. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला मिळालेला नगण्य भाव पाहून हा भाव आम्हाला मंजूर नाही तसचे ही लिलाव पद्धतही मंजूर नाही असे म्हणत ओपन लिलाव घेण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला शेतकºयांनीही दुजोरा दिला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यातून लिलावपद्धत ओपन करावी व निर्धारीत भाव सोयाबीनला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. जुनीच लिलाव पद्धत अंमलात आणून सोयाबीनची खरेदी करावी. अन्यथा उत्पन्न होणाºया परिस्थितीला व घडणाºया घटनेला बाजार समिती जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. आंदोलनकर्त्यांसह शेतकºयांची मागणी लक्षात घेऊन शेतकºयांचा रोष शांत करण्यासाठी आॅनलाईन लिलाव थांबविण्यात आला. त्यानंतर ओपन लिलाव बाजार समितीच्या आवारात घेण्यात आला. या लिलावात ज्या सोयाबीनला आॅनलाईनमध्ये २ हजार किंवा २ हजार २०० रूपये दर ठरविल्या गेला होता. त्याच सोयाबीनला २ हजार ३०० ते २ हजार ५०० रूपये प्रती क्विंटल दर देण्यात आला, हे उल्लेखनिय. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रवीण डेहनकर, सलीम शेख, अतुल शेंदरे, वैभव तळवेकर, भूपेश वाघमारे, सयलाब आगलावे यांच्यासह शेतकरी व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर आंदोलनामुळे कृ.उ.बा.समितीची चांगलीच तारांबळ उडाली होती.
संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आॅनलाईन लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:29 PM
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेला आॅनलाईन लिलाव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी बंद पाडला.
ठळक मुद्देवर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार : शेतकºयांना ३०० ते ५०० रुपयांचा फायदा झाल्याचा दावा