बिरसा मुंडा क्रीडा संकुल येथे कार्यक्रम : बोली भाषा जतनाच्या नाविन्यपूर्ण कल्पनेला प्रतिसाद वर्धा : आदिवासी गोंडीबोलीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यासोबतच बोलीभाषा संवर्धनाच्या हेतूने वर्धा जिल्हा आदिवासी संयुक्त कृती समितीच्या पुढाकाराने आदिवासी पहाट कार्यक्रम घेण्यात आला. स्थानिक आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुलात आदिवासी पहाट गोंडी गीतांचा कार्यक्रम लोकगायक सुधाकर मसराम व मुकुंद मसराम यांनी सादर केला. प्रबोधनात्मक गोंडी गीत सादर करुन मैफलीत रंग भरला. जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मडावी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य तारा खंडाते, नगरसेविका रेखा आडे, जिल्हा जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष बापूराव उईके पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, जनता दलाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी इथापे, निवृत्त विक्रीकर आयुक्त ज्ञानेश्वर मडावी, पंचायत समितीचे सदस्य साधु इरपाते, माजी नगरसेवक शरद आडे उपस्थित होते. कुँवारा भिवसन, राणी दुर्गावती, क्रांतीवीर बिरसा मुंडा या थोरांना अभिवादन करण्यात आले. लोकगायक सुधाकर मसराम व मुकुंद मसराम यांनी आदिवासी जीवन व संस्कृती, समाजाच्या बदलत्या समस्या आणि त्यातून भविष्याचे वेध घेणारी विविध सुमधुर प्रबोधनात्मक गाणी सादर केली. यावेळी बोलताना सरस्वती मडावी म्हणाल्या, आदिवासी समाजाचा सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी मनोरंजन टाळून केवळ प्रबोधनासाठी आदिवासी पहाट हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. गोेंडी भाषेचे संवर्धन करण्याची ही कल्पना नाविण्यपूर्ण आहे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करावे. निसर्गाचे रक्षण करण्याची परंपरा आदिवासी आजही लोककलांच्या माध्यमातून जोपासत आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मसराम यांनी केले. संचालन हरीदास टेकाम यांनी तर आभार अशोक धुर्वे यांनी मानले. आयोजनाकरिता राजू मडावी, चंद्रभान खंडाते, अमृत मडावी, शंकर उईके, नागोराव मसराम, विठ्ठल इवनाते, दादाराव इवनाते, कुंडलिक परतेकी, सुनील सलामे, मारोतराव कोवे, राजेंद्र कुंभरे, मुकुंद मसराम, तुकाराम आडे, मुकूल वल्के, नरेश गेडाम, संतोष कोहचडे, प्रवीण आडे, अनिता मसराम, रंजना सलामे, योगिता इवनाते, चंद्रकला खंडाते आदींनी सहकार्य केले. या नाविण्यपूर्ण उपक्रमाला यंदा दोन वर्षपूर्ण झाले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
‘आदिवासी पहाट’मध्ये गीतांमधून समोज प्रबोधन
By admin | Published: April 22, 2017 2:11 AM