हिंगणघाट क्षेत्रात काँग्रेसला धक्का, समुद्रपूर तालुका अध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:21 AM2023-06-24T11:21:57+5:302023-06-24T11:22:22+5:30

अशोक डगवार हे २० वर्षांपासून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते

Samudrapur taluka Congress president Ashok Dagwar joins NCP | हिंगणघाट क्षेत्रात काँग्रेसला धक्का, समुद्रपूर तालुका अध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

हिंगणघाट क्षेत्रात काँग्रेसला धक्का, समुद्रपूर तालुका अध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

हिंगणघाट (वर्धा) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात समुद्रपूर तालुक्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अशोक डगवार यांच्या प्रवेशामुळे समुद्रपूर तालुक्यात पक्षाचे चांगले संघटन तयार व अधिक मजबूत होईल, तसेच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली ताकद मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अशोक डगवार हे २० वर्षांपासून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच काँग्रेस जिल्हा सचिव म्हणून दहा वर्षे कार्यरत राहिले, तसेच १५ वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य राहिले, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष १५ वर्षे होते. कलार समाजाचा ओबीसी जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे होते, असे विविध पदावर ते कार्यरत होते. तसेच २०१४ ला जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या अल्प मतांनी पराभव झाला होता. 

डगवार यांनी समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा बनविण्यासाठी मी जोरदार प्रयत्न करेल, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग उपस्थित होते.

--

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Samudrapur taluka Congress president Ashok Dagwar joins NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.