नगराध्यक्षांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांची धरती म्हणून आष्टीची ओळख आहे. गुरूकुंज आश्रम मोझरीच्या धर्तीवर आष्टीचा विकास करण्यासाठी शहिदभूमी विकास आराखडा मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून नगराध्यक्ष मीरा येणूरकर यांनी केली आहे. आर्वी येथे मुख्यमंत्री आले असता नगरपंचायत आष्टीच्या नगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवकांनी निवेदन दिले. निवेदनात आष्टीला ऐतिहासिक दर्जा आहे. येथील अंतर्गत रस्ते, भूमिगत नाल्या, कपीलेश्वर देवस्थान, टेकडीवाले बाबा दर्गाह, कपिलेश्वर तलाव पर्यटन स्थळ, निमसगाव टेकडीवर उद्यान निर्मिती, स्वातंत्र्य लढ्यातील शहीद वारसा असलेले तत्कालीन पोलीस ठाण्याची इमारत, फुटी मज्जीद, टिपरीवाले बाबा मठ याठिकाणी १९२० साली महात्मा गांधी यांनी परिषद घेतली होती. त्याला विकसित करण्याचे प्रयोजन करावे. गुरूदेव प्रार्थना मंदिर यासह ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळांचा तात्काळ कायापालट करावा. शासनाकडून अपुरा निधी आल्याने शहरविकासाचे बजेट कोलमडले आहे. त्याला पूर्णत्त्वास नेण्यासाठी निधीची गरज असून गावाचा विकास मुख्यमंत्र्यांनी करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महोदय विदर्भातील असल्याने त्यांनी या निवेदनाची दखल घेत ४५ लक्ष रूपये विशेष पॅकेज म्हणून शहराच्या विकासाठी द्यावे अशी मागणीही नगराध्यक्ष येणूरकर यांनी केली आहे. निवेदन स्विकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वसन दिले. ५ कोटींची कामे करण्यावर भर देण्याची मागणी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहीदभूमीला मागील वर्षी पाच कोटी रूपये दिले आहे. त्यातील ३ कोटीच्या विकास कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून कामे पूर्णत्त्वास जात आहे. उर्वरित २ कोटी अजूनही पडून आहे. सदर निधी तात्काळ खर्च करण्यासाठी निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शहिदभूमी विकास आराखडा मंजूर करा
By admin | Published: May 14, 2017 12:47 AM