‘लोकमत’च्या वृत्ताने तपासी अधिकाऱ्यांची दाणादाणलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तहसीलदारांनी जप्त केलेला ट्रक रेतीसह पोलिसांनी सोडल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या सोमवारच्या अंकात छायाचित्रासह प्रकाशित होताच तपासी अधिकाऱ्यांची दाणादान उडाली. यातून आपली सुटका व्हावी याकरिता सोडलेल्या ट्रकमधूनच आज दुपारी ठाण्याच्या आवारात रेती टाकण्यात आली. याची माहिती शहरात पोहोचताच कालच्या छायाचित्रात नसलेली रेती आज येथे कुठून आली, या चर्चेला चांगलेच उधान आले आहे. पहिले रेती भरलेला ट्रक सोडून आपली मान वाचविण्याकरिता आज ठाण्याच्या आवारात रेती टाकण्यात आली. हा प्रकार करताना या अधिकाऱ्यांना कदाचित येथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचा विसर पडला असावा अशी चर्चा आहे. या सीसीटीव्हीत सारेच कैद झाल्याची माहिती येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यामुळे हा गोरखधंदा चालविणाऱ्यांवर आता वचक बसविणे गरजेचे झाले आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात पोलीस ठाण्याच्या दोन्ही बाजुच्या छायाचित्रासह बातमी प्रकाशित केली. यात कुठेही नसलेली वाळू आज दुपारी दिसून आली आहे. सीसीटीव्हीत उठाठेव कैद ठाण्याच्या आवारात रेती आणून सर्व झाकल्या जाईल असे वाटत असताना हा प्रकार ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला. शिवाय ट्रक पोलीस ठाण्यात येत रेती टाकून गेला त्याची नोंद स्टेशन डायरीवरील कर्मचाऱ्याने घेतली का? आदी प्रश्न अनुत्तरीत आहे.
कालपर्यंत नसलेली रेती आज हजर
By admin | Published: May 30, 2017 1:06 AM