लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: विरुळ आकाजी येथून सालफळ, मारडा, पिंपळगांव घाट पूर्ण रेती चोरट्यांनी पूर्ण पोखरून ठेवला आहे. आता तर चक्क पाण्यातून माणसाद्वारे टोपल्याने रेती काढत पूर्ण दिवस रात्र माणसाद्वारे रेती काढली जाते. मागच्या आठ दिवसाअगोदर महसूल विभागाने कडक कार्यवाही करून रेतीघाटात मुख्य रस्त्याच्या ठिकाणी खड्डे करून ठेवले होते. पण आता पुन्हा बुजविले आहे. तर मुख्य मार्गावर एक दोन एजंट ठेवल्या जाते कोणी अधिकारी या पोलीस कर्मचारी आले की पूर्ण खबर लागली जाते त्यामुळे अधिकाऱ्याच्या हातात काहीच लागत नाही.आता तर रेती चोरट्यांनी एक नवीनच शक्कल लढविली आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजूने अलायमेंट रस्ता आहे त्या रस्त्याने कामाचे ट्रक, ट्रॅक्टर, टँकर येतात जातात त्याचाच फायदा रेती तस्कर या रस्त्याचा फायदा घेतात. काही ट्रक चक्क वर्धेवरून येतात तर कोणालाही माहीत पडत नाही की या मार्गाने रेतीच्या गाड्या सुरू आहे. कारण समृद्धी महामार्गाचे काम खूप जोरात सुरू आहे. त्या मार्गावर फक्त समृद्धीचे ठेकेदार यांच्याच फक्त गाड्या चालतात तरी महसूल व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.