शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

आयुष्यमान भारत योजना नागरिकांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 9:50 PM

भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : मुरदगाव खोसे आरोग्य केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे.या योजनेअंतर्गत गरीब कुंटुबातील प्रत्येकाचे आरोग्य कवच तयार असून त्याद्वारे गंभीर आजारावर गरीब कुटुंबातील व्यक्तींना ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेणे सोईचे झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये जिल्ह्यातील १ लाख २९ हजारांपेक्षा जास्त कुंटुबाना आरोग्य कवच मिळालेले आहे. या योजनेतून आतापंर्यत १ हजारपेक्षा जास्त नागरिकांना फायदा झालेला आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना ही शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांकरिता संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. मुरदगाव बेलसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.देवळी तालुक्यातील मुरदगाव बेलसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाणे, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनील गफाट, जि. प. सदस्य वैशाली जयंत येरावार, पं. स. सभापती विद्या दशरथ भुजाडे, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, पं. स. सदस्य कुसुम प्रभाकर चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, जयंत येरावार, माजी सभापती मिलिंद भेंडे, मुरदगावचे सरपंच चंद्रकांत ठाकरे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.खासदार तडस म्हणाले, मुरदगाव बेलसरे सारख्या लहान गावात देवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्र स्थानांतरित झाल्याने या परिसरातील १८ गावे व जवळपास ३४ हजार नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध होणार आहे. या नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता पुढील आर्थिक वर्षात सुसज्ज इमारत निर्माण करण्याकरिता ३ कोटी रुपये निधी मिळवून देण्यास प्रयत्न करणार तसेच परिसरातील नागरिकांनी मुरदगाव बेलसरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा यावेळी केले. यावेळी राजेश बकाणे, सभापती जयश्री सुनील गफाट, जि.प.सदस्य वैशाली जयंत येरावार, प.स.सभापती विद्या दशरथ भुजाडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत ठाकरे केले, संचालन हिवंज यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण धवणे यांनी मानले, कार्यक्रमाकरिता मुरलीधर डहाके, संजय वानखेडे, रामदास टाळण, प्रमोद बोबडे, विजय बोतारे, पदमाकर मोकारकर, हनुमंत डहाके, प्रकाश ठाकरे, हितेश भोयर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस