देवकांत चिचाटे - नाचणगावराज्य शासनाने सुरू केलेल्या ई-पंचायत कारभाराने राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा व गावांचा कारभार अतिशय पारदर्शक झाला आहे़ यामुळे कामांनाही गती मिळाली आहे़ काही ठिकाणी मात्र या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे़ ई-पंचायत या संकल्पनेची ग्रामस्थ तर सोडा काही पदाधिकाऱ्यांनाही कल्पना नाही़ शासनाच्या इ-पंचायत संकल्पनेपासून आजही जवळपास ४० टक्के अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.ग्रामविकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतिमान व पारदर्शक व्हावा यासाठी इ-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात आली. ती राबविताना काही त्रुटी व तांत्रिक बाबींचा मोठ्या दिमाखाने वापर करून त्याचा दुरूपयोग करण्याचे काम सुरू आहे. आजही ग्रामीण भागात दुर्लक्षित अशा बहुतांश भागात ग्रा़पं़ मध्ये ही संकल्पना व्यवस्थित पोहोचली नसल्याचेच दिसून येते. त्या पोहोचल्याचा केवळ देखावा मात्र करण्यात आला आहे़ ग्रा़पं़ मधील संग्राम कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डाटा आॅपरेटरला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे़ ग्रामपंचायतचे शिपाई व कारकून नवीन प्रणालीपासून दूर असल्याचेच यावरून दिसून येते़ ग्रामपंचायत निधीतून लाखो रुपये खर्चाच्या कामांचे ई-टेंडर कसे काढण्यात येते, हे आजही बऱ्याच सरपंचांना माहिती नाही. यामुळे इ-पंचायत यशस्वी होताना दिसत नाही़
ई-पंचायतपासून सरपंच अनभिज्ञ
By admin | Published: September 29, 2014 12:49 AM