शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याचे सावट

By admin | Published: April 19, 2015 2:00 AM

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले.

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले. या पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी झाला. परिणाती उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या बियाण्यावर होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीनचे बियाने जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयाबीन हे स्वपरासिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना वापरता येवू शकतात. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाणाच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक आहे. या बियाण्यांना इजा झाल्यास त्याचा परिणात उगवण क्षमतेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सात फुटांपेक्षा जास्त नसावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. शेतकऱ्यांनी स्वत: कडील बियाणे वापरण्यासाठी या उपायांचा अवलंब करावा, असे पुण्याच्या कृषी आयुक्तांनी कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने अडचण जात आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या घरचे सोयाबीन बाजारात बियाण्यांची कमतरता जाणवण्याचे भाकीत कृषी विभागागाच्यावतीने करण्यात आले आहे. वास्तविकतेत आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन नाही. त्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. यामुळे त्यांची पंचायईत होणार असल्याचे चित्र आहे.कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले भाकित बियाणे विक्रेत्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. बियाण्यांची कमतरता असण्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्याकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.