शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

जल, जमीन, जंगल बचाओ मोहीम लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:22 PM

आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : तीन दिवसीय ११४ किमी जनजागृती सायकल यात्रा

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. जल, जमीन, जंगल बचाओ ही मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्थानिक एन.सी.सी. परेड मैदानात आयोजित विशेष कार्यक्रमात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. सी. सी. चे समादेशक अधिकारी कर्नल पद्यभान जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, इमरान राही, प्रा. किशोर वानखेडे, संजय इंगळे तिगावकर, प्रा. संतोष मोहदरे, प्रा. जगदीश यावले, प्रकाश डाखोळे, संतोष तुरक, प्रा. मोहन गुजरकर यांची उपस्थिती होती. यावेळी तीन दिवसीय ११४ कि.मी.च्या जनजागृतीपर सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. या यात्रेचे देवळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायकल स्वारांचे स्वागत करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सुरगाव येथे गुरूदेव सेवा मंडळातर्फे प्रविण देशमुख महाराज यांच्या प्रमुख उपस्थित जनजागृतीपर सायकल यात्रेतील तरुणांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधनात्मक नाटीका सादर करण्यात आली.५४ कि.मी.चा प्रवास करून ही यात्राला बोर वाघ्र प्रकल्प येथे पोहचली. तेथे वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर तळवेकर यांनी तरुणांचे स्वागत केले. त्यानंतर परतीचा प्रवास करताना रिधोरा धरण परिसरात ही जनजागृतीपर सायकल यात्रा पोहोचली असता तेथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर जामणी येथे दिनकर विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आला. २३ मार्चला जागतिक वायूदिन व शहीद दिवस पर्वावर सायकल अभियानाचे देवळी येथे समारोप झाला.सदर अभियानाचे नेतृत्त्व कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. यात स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, निहाल झाडे, लोभास उघडे, स्वप्नील मडावी, योगेश आदमने, तेजस झाडे, राजेश सुरजुसे, श्रीकांत गणवीर, संकेत काळे, अनिकेत डुकरे, स्वप्नील कडू, विक्की थुल, निलेश नेहारे, प्रतिकेश चितळकर, प्रा. रविंद्र गुजरकर, संकेत हिवंज, रितिक झाडे, विवेक दोंदल, राहुल कामडी, प्रज्वल जांभुळकर, मयुर चंदनखेडे, तुषार झाडे, रितिक बलवीर, गणेश मोरे, आकाश ऐकोणकर, शिवम भुते, रितीक कळमकर, रूपाली मुगंले, प्रगती एकोणकर, प्रणाली साबळे, पुनम बैस, पूजा घोडे, प्रतिक्षा ऐकोणकर आदी सहभागी झाले होते. या सायकल यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना जल, जमीन, जंगल याचे महत्त्व पटवून देण्यात आले.