लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असताना वर्ध्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नाही. तरीही वर्ध्यातील जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. यातूनच कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व्हेंटिलेशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे मध्य भारतातील एकमेव केंद्र ठरले आहे.कोरोना आजाराचे लक्षण असलेल्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. अशा रुग्णांवर उपचारादरम्यान गंभीर स्थितीत श्वासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. ही प्रक्रिया समजून घेत त्याचा उपयोग रुग्णांसाठी केल्यास प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. ही व्हेंटिलेशनची प्रक्रिया यंत्राद्वारे समजावून सांगण्याची व्यवस्था बहुतांश मोठ्या रुग्णालयात असते. पण, मानवी प्रतिकृती किंवा आभासी मानवी शरीराच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिल्यास डॉक्टर किंवा परिचारिकांना व्हेंटिलेशन प्रक्रिया समजून घेणे सोयीचे ठरते. परिणामी, रुग्णावर उपचार करताना हा अनुभव पाठीशी असल्याने त्यांना मोठा आधार मिळतो.म्हणूनच जवळपास दीड कोटींचा निधी खर्च करून दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. येत्या पंधरा दिवसात येथे अडीचशे डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत.आभासी मानवी शरीर औषधी किंवा अन्य उपचारावर जिवंत शरीराप्रमाणेच प्रतिसाद देते. उपचार केल्यास हुंकार उमटतो. मानवी देहाप्रमाणेच उपचारास प्रतिसाद मिळत असल्याने शिकणाºयास तांत्रिक बाजू लक्षात येतात. म्हणजे किती आॅक्सिजन किंवा हवेचा दाब असावा, हे या माध्यमातून लगेच उलगडते. प्रत्यक्ष रुग्णावर उपचार करताना असे पूर्वज्ञान असल्यास वेळ वाया जात नाही. रुग्णाची स्थिती लवकर लक्षात येते.- डॉ. सदीप श्रीवास्तव, वैद्यकीय अधीक्षक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे).रुग्णावर उपचार करण्यापूर्वी या पाश्चात्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्याधीचे स्वरूप समजून घेतले जाते. पुणे-मुंबईकडे काही रुग्णालयात अशा प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. विदर्भात दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठाने ही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रशिक्षणामुळे तज्ज्ञ मनुष्यबळ व्हेंटिलेशनसाठी उपलब्ध होईल.-डॉ. राजीव बोरले, कुलगुरू, दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठ.
मध्यभारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र सावंगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:00 AM
कोरोना आजाराचे लक्षण असलेल्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. अशा रुग्णांवर उपचारादरम्यान गंभीर स्थितीत श्वासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. ही प्रक्रिया समजून घेत त्याचा उपयोग रुग्णांसाठी केल्यास प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. ही व्हेंटिलेशनची प्रक्रिया यंत्राद्वारे समजावून सांगण्याची व्यवस्था बहुतांश मोठ्या रुग्णालयात असते.
ठळक मुद्देव्हेंटिलेशन प्रक्रिया : द.मे. आयुर्विज्ञान विद्यापीठाचा पुढाकार