विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील सनशाईन इंग्लिश स्कूलच्या ४२० विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने दिवाळीच्या सुट्यांमध्ये निरूपयोगी प्लास्टिक बाटल्या गोळा करीत शाळेच्या त्या माध्यमातून तारांच्या कुंपणाला सुरक्षा भितींचे स्वरूप देण्यात आले.या अभिनव प्रयोगाकरिता विद्यार्थी, शिक्षकांनी संपूर्ण कारंजा शहरातील हॉटेल, पाणी विक्रेते, यांच्याकडे जाऊन पाण्याच्या खाली ४ हजार बाटल्या गोळा केल्या. यानंतर आपणाकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त न फेकता त्या एका ठिकाणी गोळा करून आम्हाला बोलवा आम्ही त्याच्या योग्य वापर करू, असे संबंधित व्यावसायिकांना आवाहन केले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आवाहनाला विक्रेत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. टाकाऊ वस्तूंपासून उपक्रमाला मूर्तरूप देण्यात आले. या अभिनव उपक्रमाविषयी बोलताना विद्यार्थी म्हणाले, संपूर्ण शाळेच्या ताराच्या कुंपणाला अशा प्रकारे बाटल्यांची सुरक्षा भिंत बनविण्याचा मनोदय आहे.भविष्यात ५० हजार बाटल्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले तर शाळेच्या प्रांगणातील झेंड्याभोवती दिल्लीतील लाल किल्ल्यांच्या द्वाराचे स्वरूप देण्याची योजना असल्याचेही विद्यार्थी, शिक्षक म्हणाले.दहा दिवस घेतले परिश्रमसंस्थेच्या माजी सचिव रश्मी धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका संगीता चाफले, पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे व शिक्षकांची या उपक्रमाकरिता दहा दिवस परिश्रम घेतले आहे.हा उपक्रम सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर आम्ही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून सुरू केला. हा उपक्रम निरंतर सुरू राहणार आहे. यातून विद्यार्थ्यांना निरूपयोगी वस्तूंचा वापर कसा करावा, याचे शिक्षण मिळते. तसेच स्वच्छता अभियान कसे राबवायचे याचे बालमनावर चांगले संस्कार होतात. सौदर्यीकरण वाढते व भविष्यातील पिढीला निरुपयोगी वस्तूंचा योग्य वापर कसा करावा, याबद्दल ज्ञान मिळते.- प्रेम महिले, अध्यक्ष, सनशाईन इंग्लिश स्कूल, कारंजा (घा.).
निरुपयोगी प्लास्टिक बाटल्यांतून शाळेला सुरक्षा भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM
या अभिनव प्रयोगाकरिता विद्यार्थी, शिक्षकांनी संपूर्ण कारंजा शहरातील हॉटेल, पाणी विक्रेते, यांच्याकडे जाऊन पाण्याच्या खाली ४ हजार बाटल्या गोळा केल्या. यानंतर आपणाकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त न फेकता त्या एका ठिकाणी गोळा करून आम्हाला बोलवा आम्ही त्याच्या योग्य वापर करू, असे संबंधित व्यावसायिकांना आवाहन केले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आवाहनाला विक्रेत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देटाकाऊतून टिकावू : सनशाईनच्या विद्यार्थी, शिक्षकांचा अभिनव प्रयोग