लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरात असलेले पंचधारा धरण गत काही वर्षांपासून प्रेमीयुगलांनी आपला अड्डा बनवला आहे. कसलीही लज्जा न बाळगता येथे प्रेमी युगलांचा जंगलात वावर असतो. यात केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुल-मुली सुध्दा शाळा बुडवून मनसोक्त रंग उधळतात. पाठीवर दप्तर आणि हातात सिगरेट घेवून रस्त्याने जाणारी ही मुलं दिसली की ग्रामीण माणूस तोंडात बोटे घालतात.आपल्या आई-वडीलांच्या कष्टाची, कष्टाने कमावलेल्या पैशावर ही ओढावर मिसरूळ न फुटलेली मुलं धरणावर दारू, सिगरेट व हुक्का पितात. रिधोरा या पर्यावरण स्थळावर पर्यटक कमी आणि प्रेमी युगलच जास्त दिसतात. येथे झाडाखाली रस्त्याच्या कडेला यांचे माकडचाळे पाहुन ग्रामस्थ शिव्यांची वाखोली वाहतात.वाटेत लागणाऱ्या आकोली बस स्टॉप चौकात सिगारेटचे झुरके घेत मुलं मुलींसोबत दंगा मस्ती करतात. तेव्हा त्यांना आजुबाजूला आपले वडील, काका, मामा या वयाची माणसं आहे, याचेही भान राहत नाही. वर्धा शहरातील विविध कॉलेजचे ड्रेस घातलेली ही मुलं-मुली दिवसाच येतात. पाऊस असल्यावरच येतात असेही नाही पाऊस नसला तरी येतात. पहाटे पाच वाजतापासून वर्दळ सुरू होते. पहाटे क्लासला न जाता कॉलेजला बुट्टी धरणाचा रस्ता पकडतात. असे चित्र दररोजच दिसून येते.दामिनी पथकही थकलेदामिनी पथकाने अनेकदा या प्रेमी युगलांना समजावले. कधी रस्त्यावर दंड बैठका सुध्दा मारायला लावल्या पण झाडाखालचे प्रेम बंद झाले नाही.मी बाहेर जिल्ह्यातला नांदेडकडला आहे. पेपर फोटो छापून आला तरी घरच्यांना थोडी माहित होणार, असे एका मुलीने म्हटले. पालकांनी सावधान राहावे, पाल्यांवर लक्ष ठेवावे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.जंगलात पट्टेदार वाघ आहे. त्याच जंगलात प्रेमी-युगलांनी आपला अड्डा जमवला आहे. त्यामुळे अघटीत घटना धडणे नाकारता येत नाही.
धरणावरच भरते शाळा, कॉलेजचे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:37 PM
परिसरात असलेले पंचधारा धरण गत काही वर्षांपासून प्रेमीयुगलांनी आपला अड्डा बनवला आहे. कसलीही लज्जा न बाळगता येथे प्रेमी युगलांचा जंगलात वावर असतो. यात केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुल-मुली सुध्दा शाळा बुडवून मनसोक्त रंग उधळतात.
ठळक मुद्देप्रेमी युगलांचा धुमाकूळ : पाठीवर दप्तर, हातात सिगारेट