लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : इंडियन मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय ४४ व्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या शाळांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार रणजित कांबळे होते. तर अतिथी म्हणून जि.प. आरोग्य शिक्षण सभापती जयश्री गफाट, पंचायत समिती देवळी सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य वैशाली येरावार, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम, विज्ञान निरीक्षक उषा तळवेकर, गटशिक्षणाधिकारी सतिश आत्राम एकलव्य शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव कृष्णा कडू, माजी जि.प. सदस्य मिलिंद ठोंबरे, इंडियन मिलिटरी स्कूलचे प्राचार्य रविकिरण भोजणे, तसेच अजय भोयर, सतिश जगताप, रवींद्र टेंभरे उपस्थित होते. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी देशासाठी चांगले वैज्ञानिक मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शन हे तालुका जिल्हा, राज्य, राष्ट्र अशा चार विभागात विभागले आहे. सुदृढ आरोग्य, जलाशये, सरंक्षण, वाहतुक दळणवळण या विषयावर प्रतिकृतीचा समावेश आहे. या प्रदर्शनीत ११२ विज्ञान प्रतिकृतीचा समावेश आहे, असे सांगितले.आमदार रणजित कांबळे यांनी विज्ञान हे आपल्या जीवनाशी निगडीत असून साथनीही या ग्रीक शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. नैसर्गिक विज्ञान, पर्यावरण विश्वाला असे विज्ञानाचे बरेच प्रकार आहे. आपण आपल्याजवळील ज्ञान दुसऱ्याला दिले पाहिजे. जुन्या कर्ज आयुर्वेदिक फार मोठ्या प्रमाणात होते. त्या आयुर्वेदाद्वारे सर्जरी होत असे विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच विज्ञान हे आपल्या जीवनाशी निगडीत असल्यांनी सांगितले.माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी उत्तम वकृत्वाने विद्यार्थ्यांसह उपस्थितांची मने जिंकली ज्ञानविज्ञान संस्कार याची जीवनात गरज असल्याचे त्यांनी सांगितले गुणपत्तेचे सौदर्यी कृणी हिरावून घेवू शकत नाही तर वर्तमान तुमच्या नम्रतेचे सौंदर्य आवश्यक आहे. स्वप्ने मोठी बघा व ती साकारण्यासाठी आत्मविश्वास बाळगा जेणे करून संपादन होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन केले. यावेळी जयश्री गफाट, वैशाली येरावार, विद्या भुजाडे, दिलीप अग्रवाल, कृष्णा कडू यांनीही आपले विचार मांडले. संचालन ऋतुजा घारफळकर तर आभार सतिश आत्राम यांनी मानले. १७ जानेवारीला या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर,आ. समीर कुणावार, सीईओ अजय गुल्हाने उपस्थित राहतील.
विज्ञान हे मानवाच्या जीवनाशी निगडीत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:33 AM
इंडियन मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय ४४ व्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या शाळांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार रणजित कांबळे होते.
ठळक मुद्देरणजित कांबळे : ४४ व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन