शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

विज्ञानच सर्व समस्यांचे समाधान

By admin | Published: April 10, 2016 2:28 AM

आजच्या युगात मानवासमोर अनेक नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा विचार केला तर विज्ञानाच्या माध्यमातूनच ....

ओम महोदय : वर्तमान भारतीय विज्ञान शिक्षण प्रणालीवर वादविवाद स्पर्धावर्धा : आजच्या युगात मानवासमोर अनेक नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा विचार केला तर विज्ञानाच्या माध्यमातूनच या आव्हानांचे समाधान शोधले जावू शकते. केवळ गरज आहे ती संबंधितांनी प्रमाणिकपणे शिक्षण-प्रणालीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्तमान भारतीय विज्ञान शिक्षण प्रणाली जागतिक आव्हानांचा सामना करण्यास समर्थ आहे’ या विषयावर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अल्का चतुर्वेदी, उपाध्यक्ष भरत महोदय यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संजय भार्गव म्हणाले, विज्ञान शिक्षण प्रणालीला अर्थशास्त्राची जोड देणे काळाची गरज झाली आहे. वादविवाद स्पर्धेच्या विषयाबाबत विचार व्यक्त करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पष्ट व जाणीवपूर्वक विचार करून खऱ्या व्यावहारिकतेला विकसित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांना आत्मसात करून रोजगार व उत्पादकता या वर्तमान आव्हानाचा नेटाने सामना करणे गरजेचे आहे. भरत महोदय यांनी देशांतर्गत विज्ञान विषयक समस्या व त्यावरील उपाययोजना यावर विचार व्यक्त केले. डॉ. अल्का चतुर्वेदी यांनी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनची कार्यशैली विशद केली. या वादविवाद स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथील प्रणय साधु या विद्यार्थ्यांने प्रथम, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी चालनकर हिने द्वितीय तर तृतीय क्रमांक पांडव महाविद्यालय नागपूर येथील साईकविता नगटे यांनी पटकावला. त्याचबरोबर बजाज महाविद्यालयाची सुचिता नागपुरे आणि एमजीआयएमएस सेवाग्राम येथील सारंग बोंबटकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त केले. या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डब्ल्यु एस लेकुरवाळे, बी.डी. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग येथील भौतिकशास्त्राचे अधिष्ठाता प्रा. डब्ल्यु के. किनगे व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वसुधा वनमाली यांनी केले. याप्रसंगी सावेरी सोनी या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन गझल चांडक व अनघा बरवट यांनी केले. आभार प्रा. नकुल बरवट यांनी मानले. यावेळी डॉ. उल्का मालोदे यांनी स्पर्धेचे नियम वाचून दाखविले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)