आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांना शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान मिळत असल्याने त्यांच्या मनातील प्रश्नांची उकल होत नाही. परिणामी त्याबद्दलचे कुतूहल व उत्सुकता कायम राहत असून बालक त्यांचा शोध घेत असतात. अशाच जिज्ञासू बालकांमध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोण रुजविण्याचा ध्यास वर्ध्यातील बजाज विज्ञान केंद्राने घेतला आहे. दरवर्षी पाचशे बालकांना पुस्तकातून बाहेर काढून त्यांच्या जीवनाशी विज्ञानाशी सांगड घालण्याचा अविरत प्रयत्न चालविला आहे.कमी खर्चात उत्तम विद्यार्थी घडावा यासाठी बजाज फाउंडेशन आग्रही असल्याने त्यांनी २००७ मध्ये बजाजवाडी परिसरातील गांधी ज्ञान मंदिरामध्ये बजाज विज्ञान कें द्र सुरु केले. त्यानंतर पुण्याचे सी.के.देसाई यांच्या संकल्पनेतून गांधी ज्ञान मंदिरालगत बजाज विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंंद्राची इमारत विदेशी वास्तूविशारद यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वास गेली आहे. २०१० पासून हे विज्ञान केंद्र नव्या इमारतीत सुरु करण्यात आल्यानंतर या केंद्रातून पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करुन प्रात्यक्षिकातून त्यांच्या विचाराला चालना दिली जात आहे. या केंद्रामध्ये प्रयोगाकरिता आवश्यक असेलेले सर्व साहित्य उपलब्ध असल्याने हे केंद्र जागतिक दर्जाची प्रयोगशाळा ठरले आहे. येथील प्रयोगशाळेची पाहणी करून नागपूरसह मोठ्या शहरातही अशा प्रयोगशाळा तयार केल्या जात आहेत. त्यामुळे या विज्ञान केंद्राने अल्पावधीतच देशपातळीवर नावलौकिक मिळविला.पाच प्रयोगशाळांमधून घडताहेत विद्यार्थीबजाज विज्ञान कें द्रात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स आदींच्या वेगवेगळ्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये त्या-त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. यासोबतच बजाज कॉलेज आॅफ सायन्स, बजाज इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील तज्ज्ञांसह मुंबई, बंगलोर, चन्नई, कानपूर व दिल्ली येथील तज्ज्ञांकडून कार्यशाळा घेतली जाते.यासोबतच इंटरनॅशनल आॅलिम्पियाड परीक्षेकरिता विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष वर्ग घेतले जात आहे. हे केंद्र होमीभाभा सेंटर फॉर सायंन्सशी संलग्न असल्याने त्यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. त्यातून सायंन्स शो, टिचर ट्रेनिंग प्रोग्राम, सायन्स गेम्स, सायन्स अॅण्ड लाईफ,टॉक विथ सायन्स, सायन्स अॅण्ड थ्री मिनिट्स तसेच आकाश निरीक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहे.अशी करतात विद्यार्थ्यांची निवडबजाज विज्ञान केंद्रात दरवर्षी ५०० विद्यार्थी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची निवड जिल्ह्यातील शाळांमधून केली जाते. सध्या ३५ जिल्हा परिषद व खासगी शाळा यांच्याशी संलग्न आहे. या शाळास्तरावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर बजाज विज्ञान केंद्राच्यावतीने चवथी व सहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन निवड करतात. निवड झालेल्या ५०० विद्यार्थ्यांच्या बॅचेस पाडून त्यांना येथे प्रयोगातून शिकविले जाते. तर काही विद्यार्थीही स्वत: च्या कल्पकतेतून मॉडेल तयार करुन आणतात. शैक्षणिक सत्रात विद्यार्थी स्वत: २५० प्रात्याक्षिक करीत असल्याने त्यांच्या संकल्पना स्पष्ट होते.स्पर्धा करून केवळ मेडल मिळविणे, हा संस्थेचा मुळीच उद्देश राहिला नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे आणि त्यांच्यात स्वत: कार्य करण्याची जिद्द निर्माण करणे यासाठीच बजाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल बजाज यांच्या मार्गदर्शनात कार्य सुरू आहे. अमेरिकेत विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते, ती पद्धत हल्ली या केंद्रात उपयोगात आणली जात असल्याने येथील विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्वदूर पोहोचले आहे.डॉ.गोविंद लखोटिया, संचालक, विज्ञान केंद्र,या केंद्रातून आम्हाला कृतीयुक्त शिक्षण दिले जात आहे. येथे रट्टा पद्धतीला थारा नसून प्रत्येक उदाहरण किंवा प्रयोग स्वत: करावा लागत असल्याने त्यातील सर्व बारकावे कळायला लागतात. त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे, याचे ज्ञानही मिळत असल्याने येथून शिकलेली गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहणारी आहे.क्रिष्णा बोठे, विद्यार्थी.
प्रात्यक्षिकांतून बालकांमध्ये रुजविताहेत वैज्ञानिक दृष्टिकोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM
कमी खर्चात उत्तम विद्यार्थी घडावा यासाठी बजाज फाउंडेशन आग्रही असल्याने त्यांनी २००७ मध्ये बजाजवाडी परिसरातील गांधी ज्ञान मंदिरामध्ये बजाज विज्ञान कें द्र सुरु केले. त्यानंतर पुण्याचे सी.के.देसाई यांच्या संकल्पनेतून गांधी ज्ञान मंदिरालगत बजाज विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंंद्राची इमारत विदेशी वास्तूविशारद यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वास गेली आहे.
ठळक मुद्देबजाज विज्ञान केंद्राचा पुढाकार : दरवर्षी पाचशे विद्यार्थी गिरवितात विज्ञानाचे धडे