शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

 वर्ध्याच्या सीईओंना दिल्लीत स्कॉच पुरस्कार; 'मिशन दीपस्तंभ'ची दखल  

By आनंद इंगोले | Published: November 19, 2023 6:05 PM

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन दीपस्तंभ’ राबविण्यात आले होते.

वर्धा: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन दीपस्तंभ’ राबविण्यात आले होते. याकरिता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने या मिशनमधून विद्यार्थ्यांनी तिमिरातून तेजाकडे झेप घेतली. याचीच दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना दिल्लीमध्ये ‘स्कॉच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मंगेश घोगरे यांचीही उपस्थिती होती.

देशातील नामांकित स्कॉच पुरस्काराकरिता देशभरातील तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये  ‘मिशन दीपस्तंभ’ करिता वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची निवड होऊन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. अखेर ११ नोव्हेंबरला दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये समीर कोच्चर आणि रोहन कोच्चर यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि त्यांना या मिशनमध्ये सहकार्य करणारे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना स्कॉच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या यशस्वी परंपरेमध्ये मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. या कर्तव्यपूर्तीसाठी मिळाला सन्मानमुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याकरिता केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा पातळीवरुन राबविल्या जाणाºया उपक्रमांत एकसंघता आणली. यामध्ये डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनीही भर घातली. फाउंडेशन लर्निंग अ‍ॅण्ड न्युमेरेसीची उद्दिष्टे निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठीनियमित अंतराने विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीची पडताळणी सुरु केली. मागे राहिलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणा सज्ज करुन त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग वाढावा याकरिता पुढाकार घेऊन सराव परीक्षा आयोजित करुन विद्यार्थ्यांचा दुप्पट सहभाग वाढविला आणि उत्तीर्ण होण्याचेही प्रमाण वाढविले. यामुळेच जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला.

टॅग्स :wardha-acवर्धा