लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुका मुख्यालय असलेल्या समुद्रपूर नगरपंचायतीच्या क्षेत्रात १२ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रपूरकरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता होणार आहे.समुद्रपूर येथे २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात येत असून या कामाचा प्रारंभ आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १२ कोटी रुपयांचे अनुदान जलशुद्धीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजनेसाठी मिळाले आहे. त्या कामाचा प्रारंभ करताना समीर कुणावार यांनी गेल्या साडेचार वर्षांत मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला आमदार कुणावार यांच्यासह भाजपचे महामंत्री किशोर दिघे, समुद्रपूरचे नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष वर्षा बाभूळकर, पाणीपुरवठा सभापती प्रविण चौधरी, बांधकाम सभापती अंकुश आत्राम, महिला व बालकल्याण सभापती सुषमा चिताडे, उपसभापती आशा वासनीक, मुख्याधिकारी मालगावे, शीला सोनारे, रवींद्र झाडे, पं.स. चे उपसभापती योगेश फुसे, तारा अडवे, वनिता कांबळे, इंदू झाडे, सरिता लोहकरे, हर्षा डगवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे तर संचालन प्रशासकीय अधिकारी नितीन जगताप यांनी केले. आभार अक्षय पुनवटकर यांनी मानले.
समुद्रपूरकरांना मिळणार आता शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:20 PM
तालुका मुख्यालय असलेल्या समुद्रपूर नगरपंचायतीच्या क्षेत्रात १२ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रपूरकरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता होणार आहे.
ठळक मुद्दे१२ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्र : नगरोत्थान महाअभियान