भास्कर कलोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रुग्ण अधिक येण्याची शक्यता असल्याने येथे सुसज्ज रक्तपेढी निर्माण करण्यात आली. या रक्तपेढीला अन्न व औषधी विभागाने सिल ठोकल्याने गत तीन महिन्यांपासून येथील रुग्ण रक्तापासून वंचित आहेत.रक्तपेढीला सिल असल्याने येथे त्याचा उद्देश सिद्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या रुग्णालयातील रक्तपेढीला वैद्यकीय आधिकारी आणि आवश्यक मनुष्यबळ देण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. रक्तपेढी बंद असल्याने गरजवंतांना त्रास सहन करावा लागत आहे.येथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात सातच डॉक्टर कार्यरत आहेत. १२० खाटांचे रुग्णालय २४ तास सेवा तसेच जवळपास १००० बाह्य रुग्ण तपासणी येथे सुरू आहे. परंतु वैद्यकीय अधिक्षकाशिवाय येथील रुग्णालयाचा डोलारा सांभाळला जात आहेत. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांचे दुर्लक्ष असून वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेण्याची गरज आहे.सदर उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावर आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, उमरेड, पांढरकवडा, वर्धा या जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. मोठे शहर, मोठी बाजारपेठ, मोठी लोकसंख्या, प्रचंड रुग्ण संख्या, अपघाताचे प्रमाण, त्यानुसार सर्वपरी उपचारासाठी पूर्ण क्षमतेने डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक आहे; परंतु मंजूर १८ पदांपैकी १० अधिकाºयांची नोंद पगार पत्रकात असतांना प्रत्यक्षात सातच डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्याकडून रुग्णालयाचा गाडा हाकलल्या जात आहे. या सात डॉक्टरांपैकी एकाने आपला राजीनामा कालच सादर केला आहे. दुसºयाचा राजीनामा कधीही येवु शकतो अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.पगार पत्रकावरील १० डॉक्टरांपैकी भुलतज्ज्ञ डॉ. कपूर दोन वर्षांपासून तर दूसरे भुलतज्ज्ञ डॉ. बोंडे गत काही महिन्यांपासून वर्धा रुग्णालयात प्रभारावर आहेत. उच्च शिक्षणासाठी गेलेले डॉ. विजय कुंघाडकर प्रशिक्षण पूर्ण होऊन एक महिना झाला तरी अद्याप परतले नाही. त्यामुळे सद्यास्थितीत सात डॉक्टर असतांना पुन्हा दोन डॉक्टर स्वत: सेवामुक्त होत आहेत. कार्यरत सर्व डॉक्टर विषयतज्ज्ञ असून साध्या एमबीबीएस डॉक्टरांचा अभाव आहे. अशास्थीतीत डॉक्टराच्या वेतनाची शासनाला बचत होत असली तरी कार्यरत डॉक्टरांना त्रास व रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.येथील रक्तपेढी प्रमुखाचे पद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. येथील कारभार सांभाळणाºया तज्ज्ञाला जिल्हा अधीक्षकांनी वर्धेला नेले. यामुळे अन्न व औषधी विभागाचे अधिकारी तपासणीकरिता आले असता त्यांना यात अनियमितता आढळून आली. यामुळे त्यांनी या पेढीला सिल ठोकले. शिवाय बंदअसलेली आॅटो क्लेव मशीन दुरुस्तीचा कंत्राट फेबर सिंदोरीला दिला आहे. त्यामुळे दुरुस्तीचा दोन तीन हजाराचा खर्च आहे. हा खर्च केल्यास लेखा विभाग आक्षेप घेतो. यामुळे मशीन केव्हा दुरूस्त होते, हे सांगणे सध्या कठीण आहे.- डॉ. राहुल भोयर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट.वैद्यकीय अधीक्षकाचे पद दोन वर्षांपासून रिक्तउपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. राज्यातील ६९ वैद्यकीय अधिक्षकांच्या बदली पदस्थापना यादीत हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाची जागा मात्र भरली नसल्याचे दिसून आले आहे.आॅटो क्लेव मशीन वारंवार बंदशस्त्रक्रियेचे साहित्य निर्जन्तुक करणारी आॅटो क्लेव मशीन गत २० दिवसात तिनदा बंद पडल्याने डॉक्टर असून सुद्धा शस्त्रक्रिया होत नाही. त्यामुळे सीजर व इतर शस्त्रक्रियांसाठी शहरातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
तीन महिन्यांपासून रक्तपेढीला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:03 AM
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रुग्ण अधिक येण्याची शक्यता असल्याने येथे सुसज्ज रक्तपेढी निर्माण करण्यात आली.
ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा सात डॉक्टरांवर