शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

जिल्ह्यात दुसऱ्या सिरो सर्व्हेला झाली सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यावर ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वर्धा जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक हजाराहून अधिक व्यक्तींच्या रक्ताचे नमुने संकलित : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे घेतले जातेय सहकार्य

  महेश सायखेडे    लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या कोरोनायनात वर्धा जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूच्या प्रसाराची काय स्थिती आहे याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे महत्त्वाचा ठरत असून जिल्ह्यात दुसऱ्या सिरो सर्व्हेला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल एक हजारहून अधिक व्यक्तींच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आल्याचे आरोग्य यंत्रणेतील खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यावर ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वर्धा जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. तर दुसरा सिरो सर्व्हे दिवाळीच्या पूर्वी होणार होता. पण लक्ष्मीपूजनाच्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांची नागपूर येथे बदली झाल्याने दुसरा सिरो सर्व्हे पुढे ढकलत तो दिवाळीनंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी विविध क्षेत्रातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजाराच्यावर व्यक्तीच्या रक्ताचे नमुने दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

१९ सप्टेंबरला सादर झाला पहिल्या सर्व्हेचा अहवालमहात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने जिल्ह्यात करण्यात आलेल्या पहिल्या सिरो सर्व्हेचा अहवाल १९ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. तर आता जिल्ह्यात दुसरा सिरो सर्व्हे युद्धपातळीवर केली जात आहे. १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात २०५ कोविड बाधित ट्रेस झाले असताना सुमारे २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच ते प्रमाण केवळ १.५० टक्के होते. शिवाय रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास अद्याप बराच कालावधी लागणार यासह अनेक बाबींची ठोस माहिती पहिल्या सिरो सर्व्हेच्या अभ्यासातून आरोग्य विभागाला तसेच वैद्यकीय तज्ज्ञांना प्राप्त झाली होती हे विशेष.

हर्ड ह्युमिनिटीची मिळणार माहितीविषाणू बाबत वर्ध्याकरांमध्ये हर्ड ह्युमिनिटी विकसित झाली काय याची इत्यंभूत माहिती या सिरो सर्व्हेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळणार आहेत.

२,४३७ व्यक्तींच्या रक्ताचे घेणार नमुनेजिल्ह्यात होत असलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी एकूण २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत केले जाणार आहे.

कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे उपयुक्त ठरतो. जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर दुसरा सिरो सर्व्हे सध्या जिल्ह्यात केला जात आहे. त्यासाठी आतापर्यंत एक हजारहून अधिक व्यक्तींच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले आहे.- डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता,                                                  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

आरोग्य विभाग आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने जिल्ह्यात दुसरा सिरो सर्व्हे केला जात आहे. नागरिकांच्या रक्ताचे नमुने सध्या संकलित केले जात असून त्यानंतर त्याचे प्रयोगशाळेत विश्लेशन केले जाणार आहे. - डॉ. सचिन तडस,                                              जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या