वर्धा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागातील कामाला गती येण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी एल.एम.डुरे लाच प्रकरणात निलंबित झाल्यापासून उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम हेच प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होते.मागील दीड वर्षाच्या कालावधीत माध्यमिक शिक्षण विभागात चांगलीच मरगळ आली होती. त्यामुळे या विभागातील अनेकांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. नुकतेच गोंदिया येथील शिक्षणाधिकारी उल्हास नरड हे वर्ध्यात शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणाधिकारी म्हणून कार्य करीत असताना शाळांच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधून जलसंधारणाचे काम केले. गोदिया जिल्ह्यातही त्यांचे काम उत्तम राहिल्याने आता वर्धेकरांकडूनही तीच अपेक्षा आहे.
माध्यमिकला मिळाले शिक्षणाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 11:40 PM
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागातील कामाला गती येण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देदीड वर्ष होता प्रभार : उल्हास नरड झाले रुजू