लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबवून २८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १२४ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विना परवाना वाहने धावत असून त्यातील बहूतांश वाहने ही कालमर्यादा संपलेलीही दिसून येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ३ ते २३ आॅक्टोबर दरम्यान योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. यादरम्यान २८९ वाहने तपासली असता त्यातील १२४ वाहने दोषी आढळली. त्यामुळे दोषी वाहनांना जप्त करुन त्यापैकी १०९ वाहनांकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल केला. तसेच त्यांना तांत्रिक दुरुस्ती करून योग्यता प्रमाणपत्राकरीता नोटीस बजावण्यात आली आहे. ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक भोवते, सहायक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गवारे, चालक पांडुरंग वाघमारे यांनी केली. या मोहिमेमुळे वाहनचालक-मालकानी धास्ती घेतली आहे.
दोषी आढळलेली १२४ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:48 PM
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने योग्यता प्रमाणपत्र तपासणी विशेष कार्यक्रम राबवून २८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १२४ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून ७ लाख २६ हजार १०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
ठळक मुद्दे७.२६ लाखाचा दंड वसुल : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची तपासणी मोहीम