आंदोलन : मागण्यांचे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर व अॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली; परंतु अद्यापही हत्येचा सुत्रधार व प्रत्यक्ष मारेकरी तपास यंत्रणेच्या हाती आला नाही. यामुळे स्पेशल टास्क फोर्सची नेमणूक करून मारेकऱ्यांना त्वरीत पकडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यावळ आंदोलन करून करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसतर्फे संपूर्ण राज्यभर २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून तपास यंत्रणेचा निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या पुढील काळात राबविण्यात येणार आहे. निर्भय मॉर्निंग वॉक व निवेदनासाठी राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, संजय भगत, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, विश्वंभर वनकर तर निवेदन देण्याकरिता मुकुंद नाखले, पद्मा तायडे, सावित्री नाखले, कानोपात्रा वैद्य, हरीका ढाले, लक्ष्मण मून, सुहानी ढाले, वैजू मून, पी.ए. पोधारे आदींनी सहकार्य केले.
दाभोळकरांचे मारेकरी पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:43 AM