लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे निमित्य साधत तहसिल कार्यालयासमोर वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी आत्मक्लेष आंदोलन केले. नायब तहसिलदार मृदूला मोरे यांना निवेदन देत वेगळ्या विदर्भाची मागणी केली .महाराष्ट्र राज्यावर चार लक्ष कोटीचे कर्ज आहे. राज्याचे तुटीचे अंदाजपत्र आहे. कर्जबाजारी राज्यात राहून विदर्भाचा विकास होऊ शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रात एकमेव पीक असलेल्या ऊसाच्या उताऱ्यावर शासन भाव देते. पण, विदर्भात कापसाचे स्टेपल्स,रुईचे प्रमाणावर भाव देत नाही. युवकांचे रोजगाराचे केंद्र मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे औद्योगिक वसाहती निर्माण झाल्यामुळे आहे. विदर्भातील युवक मात्र रोजगारासाठी दारोदार फिरत आहे.शासकीय नोकºयांमध्ये विदर्भाचा सहभाग तीन टक्केच आहे. विदर्भ वेगळा झाल्यास विदर्भातील तरुणांना शासकीय नौकरी मिळेल. शेती, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. भाजप सरकारने वेगळ्या विदर्भाचा शब्द पाळला नसल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या शेवटी नायब तहसिलदार मृदूला मोरे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली .आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास कोटंबकर, दिनेश निखाड , जिवन गुरुनुले, केशव भोले , डॉ. हेमंत ईसनकर, सुनिल हिवसे , उत्तम देवढे, रूमेदव ठेंगणे, प्रविण महाजन, किसनाजी शेंडे, भाऊराव देवढे, शुभम वाढई, प्रविण कुंभारे, हर्षल वसाके, वैभव चौधरी, शुभम कुमरे, उपेंद्र कुमरे, दिपक मोटघरे, विक्रम वसाके, सुधाकर कुमरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते व शेतकरी या आत्मक्लेष आंदोलनात सहभागी झाले होेते.
वेगळ्या विदर्भासाठी आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:45 PM
भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............
ठळक मुद्देशेतकरी संघटना व राज्य आंदोलन समितीचे तहसीलदारांना साकडे