शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

स्वयंरोजगार हा बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:32 PM

जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात.

ठळक मुद्देशैलेश नवाल : जिल्हास्तरीय युवा संमेलन, उल्लेखनीय कार्य करणाºयांना केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात. युवा पिढीने आपल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगार हा पर्याय निवडला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय अंतर्गत येणाºया नेहरू युवा केंद्र वर्धातर्फे स्थानिक विकास भवन येथे जिल्हास्तरीय युवा संमेलन घेण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, मुरलीधर बेलखोडे, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, संजय माटे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ज्यात उत्पन्न काढता येते तो रोजगार, शेतीवर आधारलेले अनेक उद्योग युवकांना उभारता येतील. त्यासाठी लागणारी सर्व मदत शासन करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक मेहरे यांनी युवकांनी महत्वाकांक्षी असावे. शिवाय ती महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. तरच आपण जीवनात यशस्वी होवू शकू असे सांगितले. युवकांना मार्गदर्शन करताना गावंडे म्हणाले की, युवकांनी विकासात्मक कामाकडे लक्ष देवून त्यात पारदर्शकता कशी आणता येईल यासाठी कार्य केले पाहिजे, असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संजय माटे यांनी २०१६-१७ चा उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला. यावर्षी हा पुरस्कार आर्वी तालुक्यातील पिपंळगाव (भोसले) येथील धरणग्रस्त बहुउद्देशीय युवा मंडळ यांना प्राप्त झाला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते संबंधितांना देऊन त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्र वर्धातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे प्रमाणपत्र ही वितरीत करण्यात आले. भाषण स्पर्धेत प्रथम बक्षीस राधा राजेशकुमार तिवारी, द्वितीय क्रमांक अताउब हैदरअली अन्सारी तसेच तृतीय पुरस्कार शमा रऊफ शेख हिला देण्यात आला. जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया गजानन वडेकर, द्वितीय मंगला मारोती चौधरी, तृतीय किर्ती परशुराम सोनाये यांना प्राप्त झाला. तसेच जिल्हास्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेचा प्रथम पुरस्कार अक्षय राजेश अहिव यांना प्राप्त झाला. निसर्ग सेवा समितीचा निसर्ग सेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्ता विठ्ठल गेडाम यांचा यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी केले तर आभार अतुल कातरकर यांनी मानले. कार्यक्रमाला दयाराम रामटेके, अतुल कातरकर सतीश इंगोले, संजय अवचट, राहुल लाखे, सतीश काळे, राहुल दुरतकर, संदीप रघाटाटे, संदीप सुपटकर, किशोर ठाकरे उपस्थित होते. यशस्वीसाठी मंगेश डुबे, अमोल चवरे, सुरज राऊत, ममता नासरे, प्रिया पिसुर्डे, माधुरी नागपुरे, शितल महाकाळकर, दीक्षा सहारे, रूपाली मानकर, विकास आसुटकर, कोमल तायडे, प्रवीण कडू, स्वप्नील कडू आदींनी सहकार्य केले.