लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रिसर्च हाऊस, दत्ता मेघे वैद्यकीय अभिमत विद्यापीठ आणि दत्ता मेघे अभियांत्रिकी इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने बेटीकची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत जैविक वैद्यकीय तंत्रज्ञानावर चर्चासत्र घेण्यात आले.वैद्यकीय संशोधनातील जैवतंत्रज्ञानाला अनुसरून सर्वोत्तम तंत्रज्ञान विकसित करावे, असा मानस प्राचार्य डॉ. प्रसन्ना झाडे यांनी व्यक्त केला. डीएमआयएमएस, रिसर्च सेल डायरेक्टर डॉ. काझी, डॉ. बलिगा, डॉ. पुनीत फुलझेले यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. रिसर्च स्कॉलर, आशुतोष बागडे यांनी वैद्यकीय तंत्रज्ञानातील विकास आणि नवनवीन संशोधनावर उद्बोधन केले. तंत्रज्ञान व वैद्यकीय शाखेतील संशोधनाच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रगती काळाची गरज झालेली आहे. कमी खर्चात, आणि वेळात, जलद वैद्यकीय सेवा शोधणे ही जैवतंत्रज्ञानातील संशोधनाचे एक अभिन्न अंग आहे. अभियांत्रिकीतील तंत्रज्ञानाच्या जोरावर जैवतंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचे नवे दालन उभे केले जाऊ शकते, असा निष्कर्ष या चर्चासत्रातून निघाला.अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरी हा एकच पर्याय नसून संशोधनाच्या अनेक वाटा खुल्या आहेत. सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक प्रगती साधण्यास या विषयातून यंत्र, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञानाच्या अनेकविध शाखेत संशोधन करता येईल. अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनी बेटीक सेलच्या माध्यमातून विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली. संशोधनाच्या माध्यमातून दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यानुसार घडविण्याचा प्रयत्न आहे, झाडे यांनी सांगितले. मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन करुन संशोधनाला प्रोत्साहन दिले.इंनोव्हेशन सेलचे प्रा. शिरीष गंधारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कपिल देशमुख, प्रा. रूचिका सिन्हल (गुप्ता) यांनी आयोजनाकरिता सहकार्य केले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद यांची चर्चासत्राला उपस्थिती होती.
जैविक वैद्यकीय तंत्रज्ञानावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 9:55 PM
रिसर्च हाऊस, दत्ता मेघे वैद्यकीय अभिमत विद्यापीठ आणि दत्ता मेघे अभियांत्रिकी इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने बेटीकची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत जैविक वैद्यकीय तंत्रज्ञानावर चर्चासत्र घेण्यात आले.
ठळक मुद्देसंशोधनाला प्रोत्साहन : दत्ता मेघे अभियांत्रिकीचा उपक्रम