‘चालाल तर वाचाल’ स्पर्धा : प्रौढ महिला आणि पुरूषांसह ३२० स्पर्धकांचा सहभाग वर्धा : जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन यांच्यावतीने प्रौढ महिला व पुरूषांकरिता ‘चालाल तर वाचाल’ ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेत ३६ ते ७१ वर्षे वयोगटात ३२० स्पर्धकांनी सहभाग घेत चालण्यातून सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला. ३, ४ व ५ किमी अंतरासाठी विविध वयोगटात सदर स्पर्धा घेण्यात आली. महात्मा गांधी पुतळा येथून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यातील स्पर्धकांनी वयोगटानुसार अंतर पूर्ण केले. विजेच्या स्पर्धकांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक प्रदान करण्यात आले. मंचावर नगराध्यक्ष अतुल तराळे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, व्यावसायिक गोविंद राठी, लॉयन्स क्लबचे प्रदीप दाते, मुरलीधर फाले, गिरीष उपाध्याय, प्रा. किशोर पोफळी, प्रा. प्रभाकर भोगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महिलांच्या ३६ वर्षे वयोगटात डॉ. अभिलाषा यादव यांना सुवर्ण, शुभांगी गोतमारे यांना रजत तर पुष्पा तपासे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. ४१ वर्षे गटात संघमित्रा शेळके यांना सुवर्ण तर रजत पदक शशिकांती शर्मा व कांस्य पदक प्रतिभा उके यांनी पटकाविले. ४६ वर्षे वयोगटात संध्या ठोकळे यांना सुवर्ण, डॉ. सुरेखा तायडे यांना रजत तर मनीषा साळवे यांना कांस्य पदक देण्यात आले. ५१ वर्षे वयोगटात रेखा वर्मा यांना सुवर्ण, रेखा दर्डा यांना रजत तर विभा निकडे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. यासह ६१ वर्षे वयोगटात अनिता यादव यांना सुवर्ण, विमल वाघ यांनी रजत आणि सुष्मीता अलोणे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. पुरूषांच्या विभागात ४१ वर्षे वयोगटात नितीन राऊत यांना सुवर्ण, महेश साबळे यांना रजत तर कांस्य पदक अतुल तुपकर यांना मिळाले. ४६ वर्षे गटात जयंत हागोणे यांनी सुवर्ण, नितीन पांडे यांनी रजत तर गोविंद राठी यांनी कांस्य पदक मिळविले. ५१ वर्षे गटात सुनील वाघ सुवर्ण तर हरिष त्रिवेदी यांना रजत आणि सलीम कुरेशी यांना कांस्य पदक मिळाले. ५६ वर्षे वयोगटात अशोक कावरे यांना सुवर्ण, श्रीधर राऊत यांना रजत तर अनिल कांबळे यांना कांस्य पदक प्रदान केले. ६१ वर्षे वयोगटात भीमराव केने यांनी सुवर्ण पदक पटकाविले. ओमप्रकाश यादव यांनी रजत तर काका जीवणे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. ७१ वर्षे वयोगटात उत्तमराव फरताडे यांना सुवर्ण, सुरेश इंगोले यांनी रजत पदक तर विठ्ठल केवटे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेच्या सदस्य तथा नागरिकांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिकांनी चालण्यातून दिला सुदृढ आरोग्याचा मंत्र
By admin | Published: December 29, 2016 12:53 AM