लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद हिंगणघाटच्या तहसीलदारांनी घेतली असून सदर प्रकार नेमका काय याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.कोरानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण नागरिक घरात थांबून कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. बुधवारी कानगावातील सर्व नागरिक घरात असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोराचा आवाज होत जमीन हादरली. या हादऱ्यांमुळे घरातील वस्तू जमिनीवर पडल्या. यामुळे कानगाववासियांमध्ये एकच खळबळ उडाली होती. जमीन हादरल्याने अनेकांनी झटप घराबाहेर पळ काढला. दरम्यान काही व्यक्तींनी याची माहिती तलाठी संजू अंबादे यांना दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती तहसीलदार श्रीराम मुंदडा यांना दिली. माहिती मिळताच तहसीलदारांनी सदर प्रकार नेमका काय याची शहानिशा करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.कानगाव हे १ हजार २०० कुटुंबीयांचे गाव आहे. येथील लोकसंख्या ५ हजारांच्या घरात आहे. आज दुपारी जमीन हादरल्याची माहिती मिळताच आपण ही माहिती तहसीलदारांना दिली. हा प्रकार नेमका काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.- संजू अंबादे, तलाठी कानगाव.कानगाव, कोसुरला, मोझरी, भिवापूर परिसरात मोठा आवाज होऊन भूकंप सदृश्य हादरे बसल्याची तेथील गावकऱ्यांसह तलाठ्यांकडून माहिती मिळाली आहे. ती माहिती जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयाला आपण दिली असून याची शहानिशा होईल.- श्रीराम मुंदडा, तहसीलदार, हिंगणघाट.
भूकंपसदृश सौम्य धक्क्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कानगावात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 4:56 PM
लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देकारणांचा शोध घेणे सुरूतहसीलदारांनी घेतली नोंद