शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अत्याचाराच्या मालिका सुरूच ; अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार, गणेशनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 3:07 PM

गणेशनगर परिसरात राहणारी पीडिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला.

 वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची घटना घडल्याने संपूर्ण देश हादरला; पण, अद्याप मुलींवरील अत्याचार थांबल्याचे दिसत नाही. वर्ध्यालगतच्या बोरगाव (मेघे) परिसरातील गणेशनगर येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशनगर परिसरात राहणारी पीडिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पीडिता कुठेही मिळून न आल्याने पीडितेच्या कुटुंबीयाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.  शनिवारी युवती मिळून आल्याने पोलिसांनी तिची विचारपूस केली. गणेशनगर परिसरातीलच रहिवासी आरोपीने  पळवून नेत अत्याचार केल्याची कबुली युवतीने दिल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. त्यानुसार शहर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी अल्पवयीन आरोपी विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची घटना ताजी असताना दुसरीकडे वर्ध्यात घडलेली घटना घृणास्पद असून नराधमांनी कायदा व सुव्यवस्था शिंगावर घेतल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाने अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची गरज असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली होती. दुसºया दिवशी युवती मिळून आल्याने तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची कबुली दिल्याने याप्रकरणात ३७६ कलम शनिवारी नोंदविण्यात आली. प्रीती आडे, तपासी अधिकारी, वर्धा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी