शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लघू पशु सर्वचिकित्सालयात सुविधा ‘परिपूर्ण’ असताना सेवा ‘अपूर्ण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:52 PM

हिंगणघाट या शहराचा आवाका लक्षात घेऊन तेथील पशुपालकांची गैरसोय होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्चुन तालुका लघू पशुसंर्वचिकित्सालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी सर्व सुविधाही उपलब्ध असतांना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य सुविधा पुरविल्या जात नाही.

ठळक मुद्देपशुपालकांनी मांडल्या व्यथा : तालुक्यात तोंडखुरी-पायखुरीचे लागण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट या शहराचा आवाका लक्षात घेऊन तेथील पशुपालकांची गैरसोय होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्चुन तालुका लघू पशुसंर्वचिकित्सालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी सर्व सुविधाही उपलब्ध असतांना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य सुविधा पुरविल्या जात नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.हिंगणघाट शहरात २००५ मध्ये तालुका लघू पशुसर्वचिकित्सालयाची स्थापना करण्यात आली. या चिकित्सालयासोबत परिसरातील सात ते आठ गावे जोडली आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मदत करण्याकरिता पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, एक लिपीक व एक परीचर अशी पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्यास्थितीत लिपीक व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे रिक्त आहे. या चिकित्सालयात जनावरांवर योग्य उपचार करण्याच्या हेतूने एक्स रे युनिट, रक्त व रक्तजल या नमुन्यांची तपासणी करण्याकरिता ब्लड अ‍ॅनालायझर आदी उपकरणे आहेत. अशा सर्व सुविधा असताना येथे जनावरांवर योग्य औषोधोपचार, शस्त्रक्रिया, लसिकरण, रोगनियंत्रण होणे अपेक्षित आहे. पण, अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. काही अधिकारी मुख्यालयी न राहता आठवड्यातून दोन ते तीन दिवसच उपस्थित राहतात. त्यातही जनवारांची शस्त्रक्रिया होत नाही. केली तरी ती व्यवस्थित केल्या जात नाही. यामुळे जनावरांचे आजार सुधारण्याऐवजी आणखीच बळावत आहे, असा आरोपही पशुपालकांकडून होत आहे.आमदाराकडून दखल; अधिकाऱ्यांना खडसावलेपशुपालकांना होणाऱ्या अडचणीची दखल घेत आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, लघू पशुसर्वचिकित्सालयाच्या सहायक आयुक्त डॉ.जयश्री भुगांवकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.मंडलीक यांची उपस्थिती होती. यावेळी पशुपालकांनी समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात सध्या तोंडखुरी व पायखुरीच्या रोगाची लागण झाली असून यामुळे शेतीचे काम प्रभावित झाल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार कुणावार यांनी अधिकाºयांना धारेवर धरत जनावरांवर योग्य उपचार करा, गरजेनुसार योग्य शस्त्रक्रिया करा, अशा सूचना दिल्या.हिंगणघाटला लघू पशुसर्वचिकित्सालय असून सध्या जनावरांवर रोगराई वाढत असल्याने पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. सर्व जनावरांवर योग्य उपचार होणे अपेक्षीत असल्याने अधिकाºयांना सूचना करण्यात आल्या. तसेच या ठिकाणी आणखी एक सर्जन देण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट.