लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हयात खाजगी दूरध्वनीचे काम जोरात सुरु आहे या तुलनेत भारत संचार निगम लिमीटेडची सुविधा मागे पडत आहे. गावात भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा ग्रामीण भागापंर्यत पोहोचवण्याकरिता काम केले पाहिजे, आपल्या काही अडचणी असेल तर सोडवू पंरतु ग्राहकाकडे आपली तक्रार होता कामा नये, दुरसंचार विभागाच्या संबधीत ग्राहकांच्या तक्रारीची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश खासदार रामदास तडस यांनी दिले.भारत संचार निगम लिमीटेडच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होत. भारत संचार निगम लिमीटेड वर्धा जिल्हा मुख्य कार्यालयात खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीला स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रफुल व्यास, ताराचंद चौैबे, दीपक फुलकरी व जिल्हा प्रबधंक संजय इंगळे, शाखा अभियंता अनघा देशपांडे, मार्केटीग इंजिनीयर राजू साठोने उपस्थित होते. वर्धा दुरसंचार जिल्हयात ६३१० किलोमीटर क्षेत्रामध्ये १३ लाख लोकांना सेवा दिली जाते. यातील ७४ टक्के ग्रामीण क्षेत्रात व २६ टक्के शहरी क्षेत्रामध्ये सेवा दिली जाते. परंतु सदर सेवा देतांना ग्रामीण भागात अनेक अडचणी येत आहे.यावेळी नागपूर- यवतमाळ महामार्गाच्या कामादरम्यान काढलेल्या फोन लाइनचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाहीत. पिपरी मेघे भागातील फोन केबल तोडल्या मुळे सतत ३ महिन्यापासून फोन बंद असतात. सालोडच्या टॉवर साठी जागा दिली आहे परंतु टॉवरचे काम सुरु झाले नाही. आवी तालुक्यात गौरखेडा, पांजरा ( बोथली ), मार्डा ( विरुळ सर्कल ) या गावामध्ये कुठल्याच कंपनीचे काहीच नेटवर्क नसतात. लहान आर्वीला नवीन टॉवर झाले परंतु नेटवर्क नसते व बंदपण असते. साहूर येथे लोकांनी सेवा वापरणे बंद केले. आष्टी तालुक्यात पोरगवान पंचाळा, वडाळा, नविन आंतोरा, मोई, तारा सावंगा, देलवाडी-अंबिकापूर या गावा मध्ये काहीच नेटवर्क नाही. कारंजा, ढगा, बांगडापूर, धावसा, आजनडोह येथे येथे टॉवर बांधण्याकरिता पत्र दिले आहे पण अजून काही कारवाई झालेली नाही. नगर विकासच्या रस्ता व नाल्यांच्या कामामुळे विस्कळीत झालेल्या इतर लाईन अजून सुध्दा दुरुस्ती करण्यात आलेली नाही या मुळे फोन जास्त वेळ बंदच असतात व शासनाच्या आॅनलाईनच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे, ग्रामीण भागात अर्ज बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहे. नेटवर्क मुळे खंडित झालेले आहेत या मुळे ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांंना, नागरिकांना त्रास होत आहे. ज्या प्रकारे शासनाच्या प्रत्येक योजनांचा व विभागाचा प्रचार व प्रसार होतो भारत संचार निगम लिमिटेड वर्धा जिल्हा मध्ये असे काहीच होतो नाही. नागरिकांना सुविधा बदल काहीच माहिती नाही व त्यांना सेवा पुरविल्या जात नसल्या मुळे वारंवार जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारी येतात. या मुळे बीएसएनएल सध्याच्या परिस्थितीत आर्थिक रूपाने कमकुवत झाल्याचे दिसते. जिल्हयात बीएसएनएलच्या सुविधांचे प्रचार करावा होल्डिंग व वृतपत्रात सुविधांच्या जाहिराती द्याव्यात. बीएसएनएल नेटवर्कची व इंटरनेट सुविधेची गुणवत्ता वाढवावी जेणे करून नागरिकांचा बीएसएनएल कडे कल वाढेल या सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला अरुण बडे, एस.जी. देशमुख व्ही.के. ढोरे, पी.एस. फुलसुरे, एस.एन.देलहांडे, एस.एस.लिचडे, यु. जी. रामटेके, एस.एम.दरे. एम.एल. खडसे, डि.व्ही. वाकरे व आर पी वाघले व भारत संचार निगम लिमीटेडचे अधिकारी उपस्थित होते.तसेच आंजी मोठी येथील कार्यालय नेहमी बंद असल्या मुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहे. सदर कार्यालय नियमित सुरु करावे, तसेच मुख्य कार्यालयातील सेवा शहरात असलेल्या कार्यालयात नागरिकांना देण्यात याव्या असा आदेश खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिले. वर्धा शहर, रसुलाबाद, बोरगाव, पिपरी मेघे, सालोड, नालवाडी, ढगा (आजनडोह), येथे नवीन टॉवरचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे भारत संचार निगम लिमिटेड वर्धा जिल्हा प्रबंधक यांनी यावेळी सांगितले. अनेक मुद्दे इतर सदस्यांनी उपस्थित केले.
ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:58 PM
जिल्हयात खाजगी दूरध्वनीचे काम जोरात सुरु आहे या तुलनेत भारत संचार निगम लिमीटेडची सुविधा मागे पडत आहे. गावात भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा ग्रामीण भागापंर्यत पोहोचवण्याकरिता काम केले पाहिजे, ......
ठळक मुद्देदूरसंचार विभागाची आढावा बैठक : रामदास तडस यांचे निर्देश