शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सात महिन्यात १,०८९ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:07 PM

अल्प मनुष्यबळ असतानाही प्राप्त अर्जानुसार जमिनीची मोजणी करणे, फेरफार नोंदी घेणे आदींची एकूण १ हजार २८८ प्रकरणांपैकी मागील सात महिन्याच्या कालावधीत स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १ हजार ८९ प्रकरणांचा निपटारा केला आहे.

ठळक मुद्देअल्प मनुष्यबळ : तालुका भूमिअभिलेख कार्यालयाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्प मनुष्यबळ असतानाही प्राप्त अर्जानुसार जमिनीची मोजणी करणे, फेरफार नोंदी घेणे आदींची एकूण १ हजार २८८ प्रकरणांपैकी मागील सात महिन्याच्या कालावधीत स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १ हजार ८९ प्रकरणांचा निपटारा केला आहे. अल्प मनुष्यबळ असतानाही तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे हे कार्य इतर कार्यालयांना प्रेरणा देणारेच ठरत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्राप्त माहितीनुसार, १ एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वर्धेच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडे फेरफारीच्या नोंदी घेण्याचे ६७२ प्रकरणे प्राप्त झाले. त्यापैकी ६०२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तर याच कालावधीत मोजणीची ६१६ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी ४८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. फेरफार नोंदीची प्रलंबित असलेली ७० प्रकरणे एका महिन्याच्या आतील तर मोजणीची प्रलंबित असलेली १२९ प्रकरणे तीन महिन्याच्या आतील असल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण प्रलंबित प्रकरणे झटपट कशी निकाली काढता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.१९९ प्रकरणे प्रलंबितस्थानिक सिव्हील लाईन भागात असलेल्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीची १२९ तर फेरफार नोंदीची ७० अशी एकूण १९९ प्रकरणे प्रलंबित आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ती झटपट निकाली काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सदर कार्यालयातील अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र मनुष्यबळाची कमतरता जाणवते.मंजूर पाच; पण प्रत्यक्ष कार्यरत दोनच सर्व्हेअरवर्धा तालुका भूमिअभिलेख कार्यालयात सर्व्हेअरची पाच पद मंजूर आहेत. परंतु, सध्या प्रत्यक्षात या कार्यालयात केवळ दोनच सर्व्हेअर कार्यरत आहेत.सदर कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध कामासाठी कार्यालयातीलच इतर कर्मचाºयांचे सहकार्य घेतल्या जात आहे.३३.६३ लाखांच्या महसुलाची कमाईया कार्यालयात मोजणीची व मालकत्तेची नकल देण्याच्या प्रकरणांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे नागरिकांकडून पैसे घेतले जाते. १ एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वर्धेच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने ३३ लाख ६३ हजार ७६० रुपयांच्या महसूलीची कमाई केली आहे.सदर कार्यालयात मोठ्या प्रमाणात विविध कर्मचाऱ्यांची पद मंजूर करण्यात आल्याचे कार्यालयात असलेल्या एका फलकावरून दिसून येते. परंतु, वास्तविक पाहता स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयात नाममात्र अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत हे विशेष.