शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लेखी आश्वासनानंतर अपंगांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:06 PM

अपंगांना व्यवसायासाठी भूखंड देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाला तीन वर्षे लोटली; पण अद्याप पाच अपंगांना भूखंड देण्यात आले नव्हते. शिवाय अपंगांचा ३ टक्के निधीचा २०११ पासूनचा अनुशेष कायम होता.

ठळक मुद्दे ३ टक्के निधी प्रलंबित : ठरावानंतरही भूखंड वाटपास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अपंगांना व्यवसायासाठी भूखंड देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाला तीन वर्षे लोटली; पण अद्याप पाच अपंगांना भूखंड देण्यात आले नव्हते. शिवाय अपंगांचा ३ टक्के निधीचा २०११ पासूनचा अनुशेष कायम होता. यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने डॉ. आंबेडकर चौकात तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. गुरूवारी मुख्याधिकारी जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली.शहरातील ६०७ अपंगांपैकी पाच अपंगांनी मागणी केल्याप्रमाणे न.प. प्रशासनाने २०१४ मध्ये अपंगांसाठी भूखंड वाटपाचा ठराव आमसभेत घेण्यात आला. या ठरावानुसार गोल बाजार परिसरात १० बाय १० चे गाळे पाच अपंगांना देण्यास न.प. सभागृहाने मान्यता दिली. ठराव होऊन तीन वर्षे लोटली; पण कार्यवाही झाली नाही. शासनाच्या नियमानुसार अपंगांना न.प. टॅक्स वसुलीच्या ३ टक्के रक्कम सहायता म्हणून दिली जाते. शहरातील एकूण ६०७ अपंगांची यादी पालिकेने तयार केली आहे. त्यानुसार या वार्षिक कर वसुली प्रमाणे १६४७ रुपये प्रती अपंग देय निघाले. २२८ अपंगांना हा १६४७ रुपयांचा निधी वळता करण्यात आला; पण उर्वरित अपंगांना न.प. प्रशासन देयक देण्यास टाळाटाळ करीत होते. संघटनेने अनेकदा निवेदन देत आंदोलने केली; पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या नेतृवात राजेश पंपनवार, प्रदीप कांबळे, दिवाकर ऊगे या तीन अपंगांनी आमरण उपोषण सुरू केले.दरम्यान, पालिकेने २८८ अपंगांना निधी दिला. आता १६७ अपंगांना निधी देय आहे. गुरूवारी मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी उपोषणस्थळाला भेट देत चर्चा केली. यावेळी कुबडेसह प्रमोद कुराडकर, झोंटीग, राजेश बोभाटे, जगदीश तेलहांडे, अजय लढी, प्रदीप शेंडे, संजय बोरकर, रंजना मडावी, गंगा बावणे, आकाश बोकरे, हरिष भजभूजे व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर जागा निवासी वापराची आहे. व्यावसायिक वापर परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ३ आॅक्टोबरला पत्र प्राप्त होताच एक महिन्यांत भूखंडाचे वाटप करून दोन महिन्यांत अपंग निधीची थकबाकी देण्याचे लेखी आस्वासन मुख्याधिकारी जगताप यांनी दिले. यावरून लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.१६७ अपंगांचा निधी शिल्लकचनगर पालिका प्रशासनाने अपंगांना भूखंड वाटप करणे तथा ३ टक्के निधी वाटपास तीन वर्षांपूर्वी आमसभेत ठराव घेऊन मंजुरी प्रदान करण्यात आली होती; पण अद्याप यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती. परिणामी, अपंगांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. तीन दिवसांच्या उपोषणामुळे कार्यवाही झाली.