वर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम व पवनार आश्रमला मी दरवर्षी भेट देत असते. या ठिकाणी मला ऊर्जा मिळते, आपल्याला स्वातंत्र दिले याची जाणीव ठेवून त्यांचा तो आदर्श सर्वात मोठा आशीर्वाद समजून पुढच्या पिढीला हाच विचार पोहचविण्याचा मी प्रयत्न करते, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या बुधवारी प्रसिध्द महात्मा गांधी आश्रमात भेट देण्यासाठी सकाळी ९.३२ ला आल्या होत्या.
जागतिक पर्यटनाचा दर्जा सेवाग्राम आश्रमला मिळाला नाही, या विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. त्याच विचार पद्धतीने त्याकडे पाहिले पाहिजे. तो आदर्श आशीर्वाद म्हणून घेण्यासाठी याठिकाणी आले पाहिजे. बापूंनी भारतात ज्या गोष्टी केल्या आहेत, जी मूल्य दिली, ती विचार व कृतीतून घेतली पाहिजे असे पत्रकारांशी संवाद साधताना खा. सुळे यांनी म्हटले.
आश्रमात आगमन झाल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू,मंत्री चतुरा रासकर तसेच सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत यांनी सुतमाळेने त्यांचे स्वागत केले. तर, आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास,बापू दप्तर,महादेव कुटीतील कापूस ते कापड या उपक्रमाची माहिती मंत्री चतुरा रासकर यांनी दिली तसेच अनेक बाबींची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली.
चतुरा रासकर यांनी खादी व ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय नागपूर यांनी पत्र पाठविले आणि खादी प्रमाणपत्र नसल्याने ते तात्काळ बंद करण्यात यावे.प्रमाणपत्र घेण्यात यावे अशा आशयाचे पत्र आले होते.वास्तविक खादीचे उत्पादन हे गांधीजींच्या काळापासून परंपरागत चालू आहे.खादी हा विचार, मूल्य,स्वावंलबन,आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी साधन असल्याने आजही आश्रमात कायम आहे.पण प्रमाणपत्र घेणे सरकारचा नियम असला तरी खादी प्रमाणपत्राची सक्ती करू नये खादी असरकारी असावी असा सुरूवातीपासून विचार आहे असे आमचे म्हणणे असून या बाबत आपण प्रयत्न करावा अशी चर्चा खा.सुप्रिया सुळे यांच्याशी चतुरा बहन यांनी केली.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाबाबत अभियंता यांनी माहिती दिली. माजी आ.राजू तिमांडे यांनी सेवाग्राम पवनारसह आजुबाजुच्या खेड्यांच्या देखील विकासाच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे सांगितले. तर रूपेश कडू यांनी नाव सेवाग्राम विकास आराखडा पण सेवाग्राम गाव व गावातील पांदन रस्त्यांच्या विकासाचा विचार झाला पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी माजी आ.प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, सुधिर कोठारी,किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अभिजित फाळके, युवा जिल्हाध्यक्ष संदीप किटे, संजय काकडे, संदीप भांडवलकर, रोशन तेलंग, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा धाकटे, सुजाता फुसाटे, सेवाग्राम पोलिस स्टेशन चे निरीक्षक निलेश ब्राम्हणे,सविता कावरे,मेघाली गावंडे,विवेक लोणकर तसेच आश्रमच्या संचालिका शोभा कवाडकर, सिध्देश्वर उंबरकर, आकाश लोखंडे, विजय धुमाळे, रूपाली उगले,अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर इ.सह कार्उयकर्ते उपस्थित होते.