पिकांना योग्य हमीभाव मिळावा : देशभरातून शेकडो प्रतिनिधींची सभेला उपस्थितीसेवाग्राम : येथील यात्री निवासमध्ये अखिल भारतीय किसान सभेची राष्ट्रीय कौन्सिल बैठक घेण्यात आली. यात पिकांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासह सात ठराव पारित करण्यात आले. सभेच्या समारोपीय बैठकीला अ.भा. किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम, सरचिटणीस हन्नन मोल्ला, माजी खासदार एम.आर. पिल्ले, बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेता सूर्यकांत मिश्रा, के. वरदराजन, मदन घोष, एस. मुल्ला रेड्डी, सहसचिव एन.के. शुक्ला, अशोक ढवळे, नृपेन चौधरी, विजू कृष्णण, पी. कृष्णप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत. त्त्यांच्या कुटुंबांना भेट देण्यात येणार असून दिल्ली येथे संसदेसमोर धरणे करण्यात येईल, पिकांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक हमीभाव मिळावा यासाठी देशपातळीवर आंदोलन, शेतकऱ्यांसाठी घातक असलेल्या भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठी व्यापक लढा उभारण, दृष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्ताना भरपाई मिळवून देणे., १ आॅगस्ट रोजी शेतकरी, शेमजूर कामगारांचा विधानसभेवर मोर्चाचे, असे ठराव बैठकीत घेण्यात आले. जिल्ह्यातील यशवंत झाडे, जानराव नागमोते, महेश दुबे, संजय भोयर, सिताराम लोहकरे, भैय्यास देशकर यासह शेतकरी सहभागी झाले होते.(वार्ताहर)
किसान सभेच्या बैठकीत सात ठराव पारित
By admin | Published: July 18, 2015 1:54 AM