शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

सोनेगाव (आबाजी) येथे खासदारांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:53 PM

पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप २०१८ मध्ये सहभागी वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी, सेलू व कारंजा तालुक्यात बक्षिस जिंकण्याकरिता जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक गावात श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य लोकसहभागातून प्रारंभ झाले आहे.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : गाव पाणीदार करण्यासाठी आबालवृद्धही मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप २०१८ मध्ये सहभागी वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी, सेलू व कारंजा तालुक्यात बक्षिस जिंकण्याकरिता जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक गावात श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य लोकसहभागातून प्रारंभ झाले आहे. याच स्पर्धेचा एक भाग म्हणून देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) तिर्थक्षेत्र परिसरात खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जलसंधारणाच्या तत्वावर चळवळ उभारल्यास सर्व गावे पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही. हे महत्त्वाचे कार्य जलतज्ञ माधव कोटस्थाने यांच्या मार्गदर्शनात सेलू तालुक्यातील तामसवाडा येथे नाला खोलीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. यामुळे आपल्या गावातील आपले हक्काचे पावसाचे पाणी आपल्याच गावात टिकून राहण्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना, पाणी फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन सोबतच सामाजिक संघटनांकडून प्रारंभ केलेल्या या कार्यात सर्व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी केले.पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील देवळी तालुक्यातील सोनेगाव येथे श्रमदान करण्यासाठी खासदारांसह जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, जि.प. सदस्य वैशाली येरावार, प्रवीण सावरकर, जयंत येरावार, दीपक फुलकरी, समीर देशमुख, देशमुख, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, प्रवीण जैन, तहसीलदार भागवत, पोलीस निरीक्षक ठाकूर, न्यू आर्टस महा. पुलगाव, एसएसएनजे देवळीचे प्राध्यापक व विद्यार्थी, तथा स्थानिक जि.प. शाळेचे शिक्षक व विध्यार्थी सहभागी झाले होते.