लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : मुंबई येथून नजीकच्या शिरुड येथे आलेले दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारच्या सुचनांना केेंद्रस्थानी ठेऊन शिरुड परिसरात क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तर या रुग्णांच्या निकट संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.अल्लीपूर अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरुड येथे १८ मे रोजी ३५ वर्षीय महिला व सदर महिलेचा ३७ वर्षीय पती हे मुंबई येथील चेंबूर परिसरातून परतले. सदर दाम्पत्य कोरोना बाधित क्षेत्रातून आल्याने डॉ. ज्योती मगर, डॉ. रुचिरा कुंभारे, डॉ. निखिता टिचुकले यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.त्यानंतर या दाम्पत्याच्या निकट संपर्कात आलेल्या एकूण आठ व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी तीन व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित पाच व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. या आठही व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे.सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरूसदर दाम्पत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच या दाम्पत्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी उपचार करीत असल्याचे सांगण्यात आले.लो-रिस्क संपर्कातील चौघे क्वारंटाईनसदर दाम्पत्याच्या लो-रिक्स संपर्कात चार व्यक्ती आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. शिवाय त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलातशिरुड येथे कोरोनाचा रुग्ण आढळताच तेथे केंद्र सरकारच्या सूचनांना केेंद्रस्थानी ठेऊन शिरुड परिसरात क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात आली आहे. शिवाय हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा, अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले यांनी शिरुड गाठून पोलीस पाटील जया नीतीन उडकुडकर, उप सरपंच श्रीधर झाडे यांच्या मदतीने परिसर सील केला. कंटेन्मेंट झोन मध्ये शिरुड तर बफर झोन मध्ये पिंपळगाव (हा.), येरणवाडी, गौळ, वणी (लहान) या गावांचा समावेश असल्याचे उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी सांगितले.मुंबईहून सावंगीत परतलेली परिचारिका निघाली कोरोनाबाधितवर्धा : मुुंंबई येथील सायन परिसरातून १६ मे रोजी सावंगी (मेघे) या वर्धा शहराशेजारील गावात परतलेल्या परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावंगी (मेघे) येथील मेडिकल कॉलेज परिसर तसेच वॉर्ड क्रमांक १ पूर्णपणे सील करण्यात आला आहे. शिवाय कोरोना बाधित परिचारिकेला सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.परिचारिकेचा पती सलून व्यावसायिककोरोना बाधित महिलेच्या पतीचे सलूनचे दुकान आहे. त्याच्याशी संपर्कात कुणी व्यक्ती आला होता काय याचा शोध सध्या महसूल, पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी घेत आहेत.तिघांचे स्वॅब पाठविले प्रयोगशाळेतकोविड बाधित परिचारिकेच्या निकट संपर्कात तीन व्यक्ती आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. खबरदाचीचा उपाय म्हणून या तिन्ही व्यक्तींच्या घरातील द्रवाचे नमुने घेऊन ते सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
शिरुडचे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM
अल्लीपूर अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिरुड येथे १८ मे रोजी ३५ वर्षीय महिला व सदर महिलेचा ३७ वर्षीय पती हे मुंबई येथील चेंबूर परिसरातून परतले. सदर दाम्पत्य कोरोना बाधित क्षेत्रातून आल्याने डॉ. ज्योती मगर, डॉ. रुचिरा कुंभारे, डॉ. निखिता टिचुकले यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले.
ठळक मुद्देपरिसर सील : निकट संपर्कातील आठ व्यक्तींचे स्वॅब पाठविले सेवाग्रामच्या प्रयोगशाळेत तपासणीला